
भारताचा मिस्टर ३६० म्हणून ओळखला जाणारा फलंदाज इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. भारताने त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना इंग्लंडला ४-१ ने पाणी पाजलं.
मात्र सूर्याची बॅट संपूर्ण मालिकेत शांतच राहिली. त्याच्या एकाही सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. दरम्यान आता टी-२० मालिका झाल्यानंतर श्रेयस अय्यरच्या जागी संघात संधी दिली गेली आहे.
इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेसाठी सूर्यकुमार यादवसह धाकड अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेला देखील भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. शेवटच्या दोन्ही सामन्यात दुबेची बॅट चांगलीच तळपली. दुबेने इंग्लिश गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. आता भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेचा थरार रंगणार आहे.
या मालिकेसाठी सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांना भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे हे दोघेही रणजी खेळण्यासाठी परतले आहेत. हे दोघेही जम्मू आणि काश्मीर संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात खेळताना दिसून आले होते.
या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेसह यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मादेखील खेळताना दिसून आला होता. मुंबईचा पुढील सामना हरियाणाविरुद्ध रोहतकच्या मैदानावर होणार आहे.
या सामन्यासाठी श्रेयस अय्यर संघातून बाहेर पडला आहे. तर सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेचा रणजी संघात समावेश करण्यात आला आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झालेल्या सामन्यात शिवम दुबेने शानदार ५३ धावांची खेळी केली होती.
त्यानंतर त्याच्या डोक्याला चेंडू लागल्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं होतं. त्याच्या जागी कन्कशन सब्सिट्यूट म्हणून हर्षित राणाला संघात स्थान दिलं गेलं होतं.
अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, सिद्धेश लाड, शिवम दुबे, आकाश आनंद (यष्टीरक्षक), हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), सूर्यांश शेडगे, शार्दुल ठाकुर, शम्स मुलानी, तनुष कोटीयन , मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूजा, रॉयस्टन डायस, अोथर्व अंकोलेकर, हर्ष तन्ना, अंगकृष रघुवंशी, अमोघ भटकल, सूर्यकुमार यादव,
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.