Vaibhav Suryawanshi and Shubman Gill saam tv
Sports

ICC Ranking : आयसीसी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर; वनडेमध्ये शुभमन गिल, टी २० मध्ये वैभव सूर्यवंशीची जबरदस्त झेप

icc rankings latest update : आयसीसी रँकिंगमध्ये जबरदस्त उलटफेर झाला आहे. वनडेमध्ये शुभमन गिल यानं अव्वल स्थानी झेप घेतली आहे. तर युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी यानं टी २० रँकिंगमध्ये भरारी घेतली आहे. डावखुरा युवा फलंदाज इशान किशनलाही चांगलाच फायदा झाला आहे.

Nandkumar Joshi

आयसीसीने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या रँकिंगमध्ये मोठा बदल झाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिल हा पुन्हा वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. सध्या त्याचे ८०१ रेटिंग पॉइंट आहेत. भारतीय कर्णधारानं न्यूझीलंडचा डेरिल मिचेल (७९४ गुण) याला तगडा झटका दिला आहे. मिचेल हा यावर्षी जानेवारीपासून पहिल्या स्थानी होता.

भारताचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली हा ७६७ गुणांसह तिसऱ्या आणि रोहित शर्मा हा ७५८ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. तर गोलंदाजी रँकिंगच्या टॉप १० मध्ये झालेला बदल क्रिकेट विश्वाला आश्चर्याचा धक्का देणारा आहे. नामिबियाचा फिरकीपटू बर्नार्ड शोल्ट्ज यानं युट्रेक्टमध्ये नेपाळ आणि नेदरलँडविरुद्धच्या आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्डकप लीग २ ट्राय-सीरिजमध्ये चांगली कामगिरी केली असून, पाच स्थानांनी झेप घेत सातव्या स्थानी पोहोचला आहे.

वैभव सूर्यवंशीची गरूडझेप

युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी यानं टी २० फलंदाजांच्या रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. १५ वर्षीय सूर्यवंशीने २३० स्थानांनी झेप घेत तो थेट ४८ व्या स्थानी पोहोचला आहे. त्याचे ५३६ गुण आहेत. अलीकडेच झिम्बाब्वे दौऱ्यावर तीन सामन्यांच्या टी २० मालिकेत तुफानी फलंदाजी केली. त्याने ५०.३३ च्या सरासरीने सर्वाधिक १५१ धावा केल्या. मालिकावीराचा पुरस्कारही त्यानं पटकावला. तर तिसऱ्या टी २० सामन्यात ८१ धावांची स्फोटक खेळी करून तो सामनावीर देखील ठरला. एकाच मालिकेत दोन्ही पुरस्कार पटकावणारा तो सर्वात कमी वयाचा क्रिकेटपटू ठरला आहे.

अभिषेक शर्माचे नुकसान

भारताचा डावखुरा युवा फलंदाज इशान किशन टी २० रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्याचे ९१० गुण आहेत. इशान किशनच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट रेटिंग आहे. दुसऱ्या टी २० सामन्यात ८१ धावांची खेळी केल्यानंतर तो ९१६ गुणांवर होता. मालिका संपल्यानंतर त्याच्या रेटिंगमध्ये घसरण झाली. आतापर्यंतची ही चौथी सर्वाधिक चांगली रेटिंग आहे. सूर्यकुमार यादव ९१२ गुण, डेविड मलान ९१९ गुण आणि अभिषेक शर्मा हा ९३१ गुण यांची उत्तम रेटिंग होती. इशान किशनने झिम्बाब्वे मालिकेत १४५ धावा केल्या. तर अभिषेक शर्मा पुरता अपयशी ठरला. त्याची ८१९ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. तीन सामन्यात त्याने फक्त ११ धावा केल्या. पाकिस्तानचा साहिबजादा फरहान हा ८४८ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.

कर्णधार श्रेयस अय्यरला फायदा

टी २० फलंदाजांच्या क्रमवारीत उपकर्णधार तिलक वर्माचा दोन स्थानांनी फायदा होऊन तो सहाव्या, तर कर्णधार श्रेयस अय्यर २४ व्या स्थानी आहे. झिम्बाब्वेचा फलंदाज रयान बर्ल हा ८५ व्या स्थानी आहे. तर मालिकेत ३ विकेट घेणारा रवी बिश्नोई गोलंदाजांच्या क्रमवारीत ३१ स्थानांनी झेप घेत ४१ व्या स्थानी पोहोचला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी ३ पर्यंत स्थगित

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

Kalyan : कल्याण हादरलं! काळा तलावात सापडला १७ वर्षीय मुलीचा मृतदेह; पोलिसांनी ३२ कॅमेरे चेक केले अन्...

SCROLL FOR NEXT