वैभव सूर्यवंशीचा आणखी एक विक्रम; वयाच्या १५ व्या वर्षी अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच फलंदाज

Vaibhav Suryavanshi History: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावून वैभव सूर्यवंशीने आणखी एक जागतिक विक्रम प्रस्थापित केलाय. वयाच्या १५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात दोन अर्धशतके झळकावण्याचा पराक्रम करणारा तो क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज ठरलाय.
Vaibhav Suryavanshi History
Vaibhav Suryavanshi world record at age 15 in international cricketsaam tv
Published On
Summary
  • वैभव सूर्यवंशीचा जागतिक विक्रम

  • वयाच्या १५ व्या वर्षी दोन अर्धशतके झळकावणारा फलंदाज

  • भारत झिम्बाब्वे सामन्यात वैभव सूर्यवंशीची विक्रमी खेळी

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यात वैभव सूर्यवंशीने इतिहास रचलाय. वयाच्या १५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात दोन अर्धशतके झळकावणारा तो जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरलाय. या खेळाच्या इतिहासात यापूर्वी कोणत्याही फलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाहीये.

Vaibhav Suryavanshi History
Zhandu Kumar: भाजी विकली, ई-रिक्शा चालवली...; संघर्षाच्या जोरावर भारतासाठी कॉमनवेल्थ गेम्सचं पहिलंच पदक जिंकून झंडू कुमार यांनी इतिहास रचला

रविवारी २६ जुलै रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात सूर्यवंशीने ३१ चेंडूंत अर्धशतक झळकावलंय. या मालिकेतील पहिल्या सामन्यातही त्याने अर्धशतक केलं होतं. अशाप्रकारे वयाच्या १५ व्या वर्षी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक ठोकणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरलाय. वैभवच्या आधी, कुशल मल्ला या नेपाळच्या फलंदाजाने वयाच्या १५ व्या वर्षी एकदिवसीय (ODI) क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावले होतं.

Vaibhav Suryavanshi History
IND vs PAK : भारत-पाकिस्तानचा महामुकाबला ठरला, पण एकाच अटीवर भिडणार कट्टर प्रतिस्पर्धी, पाहा वेळापत्रक

मात्र, या वयात त्याच्या नावावर केवळ एक अर्धशतक होतं. आता वैभवने दोन अर्धशतके केली आहेत. वयाच्या १५ व्या वर्षी टी-२० क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणे हा वैभव सूर्यवंशीच्या नावावर झालेला एक जागतिक विक्रम होता. ही कामगिरी करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला. त्याचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले जाईल. त्यानंतर, वयाच्या १५ व्या वर्षीच त्याने दुसरे अर्धशतकही ठोकले. ही कामगिरी करणारा तो जगातील पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे. क्रिकेटच्या शतकानुशतकांच्या इतिहासात वैभवपूर्वी इतर कोणत्याही फलंदाजाला ही कामगिरी जमली नव्हती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com