champion trophy twitter
Sports

Champions Trophy 2025: 8 संघ, 19 दिवस, 15 सामने..आजपासून क्रिकेटच्या मिनी वर्ल्डकपला सुरुवात! पाहा संपूर्ण वेळापत्रक

Champions Trophy 2025 Squads, Schedule And Time Table: आजपासून क्रिकेटचा मिनी वर्ल्डकप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे.

Ankush Dhavre

क्रिकेटमधील मिनी वर्ल्डकप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. २०१७ नंतर पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी फायनल गाठली होती.

या सामन्यात भारताला पराभूत करत पाकिस्तानने जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. आता या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र बीसीसीआयने भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला. त्यामुळे भारतीय संघाचे सामने दुबईत खेळवले जाणार आहेत.

हे ८ संघ भिडणार

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत जगातील ८ संघ भिडताना दिसून येतील. ज्यात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या संघाचा समावेश आहे.

भारतीय संघाचा अ गटात समावेश करण्यात आला आहे. या गटात, भारतासह, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश या संघांचा समावेश आहे. तर ब गटात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे.

कुठे होणार आहेत सामने?

ही स्पर्धा देखील हायब्रीड मॉडेलमध्ये खेळवली जाणार आहे. सर्व संघांचे सामने कराची, लाहोर आणि रावळपिंडी या ३ मैदानावर रंगणार आहे. तर भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत खेळवले जाणार आहेत. भारताने जर सेमी फायनल आणि फायनलमध्ये प्रवेश केला, तर हे सामने देखील दुबईत खेळवले जातील.

या स्पर्धेसाठी असे आहेत ८ संघ:

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रिषभ पंत, हार्दिक पंड्या,हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रविंद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव.

बांग्लादेश: नजमुल हुसेन शान्तो (कर्णधार), मुश्फिकुर रहीम (यष्टीरक्षक), तोहीद हृदोय, सोम्य सरकार, तंजीद हसन, महमुदुल्लाह, जेकर अली, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, परवेज हुसैन, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसैन, नसुम अहमद, तंजीम हसन आणि नाहिद राणा.

न्यूझीलंड: मिचेल सँटनर (कर्णधार), मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेवोन कॉनव्हे, काइल जेमीसन, मॅट हेनरी, टॉम लेथम (यष्टीरक्षक), डॅरिल मिचेल, विलियम ओरुर्के, केन विलियमसन, विल यंग, जेकब डफी, ग्लेन फिलिप्स, रचिन रविंद्र, नाथन स्मिथ.

पाकिस्तान: मोहम्मद रिजवान (कर्णधार), बाबर आजम, फखर जमान, कामरान गुलाम, सऊद शकील, तेयब ताहीर, फहीम अशरफ, उस्मान खान, अबरार अहमद, हारिस रऊफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन शाह अफरीदी, खुशदिल शाह, सलमान अली आगा.

अफगाणिस्तान: हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), इब्राहिम जादरान, रहमानुल्लाह गुरबाज, सेदिकुल्लाह अटल,अजमतुल्ला उमरजई, मोहम्मद नबी, राशिद खान, नांग्याल खरोती, नूर अहमद, फजलहक फारूकी, फरीद मलिक, नवीद जादरान, रहमत शाह, इकराम अलीखिल, गुलबदीन नायब.

इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस एटकिंसन, टॉम बेंटन, हॅरी ब्रुक, ब्रायडन कार्स, बेन डकेट,आदिल राशिद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट, मार्क वुड, जेमी ओवरटन, जेमी स्मिथ, लियाम लिविंगस्टन.

ऑस्ट्रेलिया: स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), सीन एबॉट, एलेक्स कॅरी, बेन ड्वार्शिस, नाथन एलिस, जेक फ्रेजर-मॅकगर्क, आरोन हार्डी, ट्रेविस हेड,ग्लेन मैक्सवेल, तनवीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, एडम जाम्पा,जोश इंग्लिस, स्पेंसर जॉनसन, मार्नस लाबुशेन.

दक्षिण अफ्रीका: टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी जोरजी, मार्को जानसेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम,लुंगी एनगिडी, कैगिसो रबाडा, रयान रिकेलटन, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रासी वैन डेर डुसेन, कॉर्बिन बॉश, डेविड मिलर, वियान मुल्डर.

चॅम्पियन्स ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक...

19 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची

20 फेब्रुवारी- बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई

21 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कराची

22 फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर

23 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई

24 फेब्रुवारी- बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी

25 फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी

26 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर

27 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी

28 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर

1 मार्च - दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, कराची

2 मार्च- न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई

4 मार्च- उपांत्य फेरी-1, दुबई

5 मार्च- उपांत्य फेरी-2, लाहोर

9 मार्च - फायनल, लाहोर (भारत अंतिम फेरीत पोहोचल्यास दुबईमध्ये खेळला जाईल)

10 मार्च - राखीव दिवस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

Trump Putin Summit : भारतावरचा टॅरिफ रद्द होणार? ट्रम्प-पुतीन भेटीत काय घडलं?

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवात ७५ गोविंदा जखमी, काहींची प्रकृती गंभीर, एकाचा मृत्यू

Dog Bite: दिसेल त्याचे तोडले लचके;इंदापुरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ,सीसीटीव्हीत घटना कैद

SCROLL FOR NEXT