Summer Makeup Tips: उन्हाळ्यात ग्लोइंग लुक पाहिजे? मग वापरा या सोप्या मेकअप ट्रिक्स

Shruti Vilas Kadam

हलका मॉइश्चरायझर वापरा

उन्हाळ्यात त्वचा जड क्रीममुळे तेलकट दिसू शकते. त्यामुळे हलका आणि ऑइल-फ्री मॉइश्चरायझर वापरल्यास त्वचा हायड्रेट राहते आणि नैसर्गिक ग्लो मिळतो.

Makeup Tips Foundation

प्रायमर लावायला विसरू नका

मेकअप लावण्यापूर्वी प्रायमर वापरल्यास त्वचा स्मूथ दिसते आणि मेकअप जास्त वेळ टिकतो. घामामुळे मेकअप खराब होण्याची शक्यता कमी होते.

Highlighter Makeup Tips | GOOGLE

लाइटवेट फाउंडेशन निवडा

उन्हाळ्यात जड फाउंडेशनऐवजी हलकं किंवा BB/CC क्रीम वापरणं चांगलं. यामुळे त्वचा फ्रेश दिसते आणि मेकअप नैसर्गिक वाटतो.

Makeup Tips Foundation

सनस्क्रीनचा वापर करा

मेकअप करण्यापूर्वी सनस्क्रीन लावणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे त्वचा सूर्याच्या हानिकारक किरणांपासून सुरक्षित राहते आणि टॅनिंग टाळता येते.

Makeup Tips Foundation

क्रीम ब्लश वापरा

पावडर ब्लशऐवजी क्रीम ब्लश वापरल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक गुलाबी चमक दिसते. त्यामुळे त्वचा अधिक फ्रेश आणि ग्लोइंग वाटते.

Makeup Tips Foundation

वॉटरप्रूफ मेकअप निवडा

उन्हाळ्यात घाम जास्त येतो. त्यामुळे वॉटरप्रूफ काजळ, मस्कारा आणि आयलाइनर वापरल्यास मेकअप पसरत नाही.

Makeup Tips

सेटिंग स्प्रे वापरा

मेकअप पूर्ण झाल्यावर सेटिंग स्प्रे वापरल्यास मेकअप दीर्घकाळ टिकतो आणि चेहऱ्यावर फ्रेश व ग्लोइंग लुक कायम राहतो.

Makeup Tips Foundation

Eye Care: चष्म्याचा नंबर कमी करायचा आहे? मग डॉक्टरांनी सांगितलेले 'हे' ७ फळ ठरतील वरदान

Eye Care | Saam Tv
येथे क्लिक करा