Solapur : सोलापुरात SRPF जवानाची आत्महत्या; ६ जणांविरोधात गुन्हा दाखल, धक्कादायक कारण समोर

Solapur SRPF Sucide News : सोलापुरात SRPF जवान विलास शिंदे यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पत्नीच्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे
Solapur : सोलापुरात SRPF जवानाची आत्महत्या; ६ जणांविरोधात गुन्हा दाखल, धक्कादायक कारण समोर
Solapur SRPF Sucide NewsSaam Tv
Published On
Summary
  • सोलापुरात SRPF जवान विलास शिंदे यांची आत्महत्या

  • मुळेगाव येथील राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना

  • सहा जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

  • पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू

विश्वभूषण लिमये, सोलापूर

सोलापुरात एका एसआरपीएफ जवानाने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. मानसिक तणावातून ही आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. सदर जवानाचे नाव विलास सर्जेराव शिंदे (वय ३५) असे आहे. सोलापुरातील मुळेगावमधील बिरसामुंडा नगर येथील त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन शिंदे यांनी आत्महत्या केली. शिंदे यांच्या पत्नीच्या आरोपावरून सहा जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत विलास शिंदे यांचा मामा आरोपी भीमाशंकर काळे यांच्यासोबत जुन्या केसच्या कारणावरून वाद होता. या कारणातून भीमाशंकर काळे व भाग्यश्री काळे यांना जेल रोड पोलिसांनी दोन-तीन दिवसांपूर्वी अटक केली होती.

Solapur : सोलापुरात SRPF जवानाची आत्महत्या; ६ जणांविरोधात गुन्हा दाखल, धक्कादायक कारण समोर
Shocking : 'कमी पगार मिळतो' म्हणून उठताबसता टोमणे; वैतागलेल्या नवर्‍याने बायकोसह ७ वर्षांच्या मुलीची केली निर्घृण हत्या

यावरून १२ मार्च रोजी दुपारी विलास हे मुळेगाव येथील घरी असताना ६ जणांनी मुळेगाव येथील घरी येऊन त्यांना शिवीगाळ करून आमच्यावरील खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा मागे घ्या, नाहीतर तुकडे करून मारून टाकीन अशी धमकी देऊ लागले.

Solapur : सोलापुरात SRPF जवानाची आत्महत्या; ६ जणांविरोधात गुन्हा दाखल, धक्कादायक कारण समोर
Accident News : रोजा सोडला, चहा पिण्यासाठी निघाले पण वाटेतच काळाने घातला घाला, सोलापूरमध्ये २ मित्रांचा अपघाती मृत्यू

हे भांडण सुरू असताना एकाने विलास यांना चपलेने मारहाण सुरू केली. हे चित्र आजूबाजूचे लोक पाहत होते, यामुळे विलास रडत होते. यातूनच नैराश्येत आणि तणावात येऊन विलास यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी विलास यांच्या पत्नी पूनम विलास शिंदे यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून सहा जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com