I will hit you with the bat virat kohli gets angry on rishabh pant watch video amd2000 twitter
Sports

Virat Kohli Viral Video:'बॅटने मारेन..' लाईव्ह सामन्यात विराट कोहली रिषभ पंतवर भडकला - Video

Virat Kohli -Rishabh Pant Viral Video: बंगळुरु- दिल्ली सामन्यादरम्यान विराट कोहली रिषभ पंतवर भाडकल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ६२ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने शानदार कामगिरी करत ४७ धावांनी विजय मिळवला. हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा या हंगामातील सलग पाचवा विजय ठरला. पहिल्या डावात फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १८७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाला १४० धावा करता आल्या.

रिषभ पंतचा व्हिडिओ व्हायरल

यापूर्वी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला निर्धारित वेळेत २० षटकं पूर्ण करता आली नव्हती. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात रिषभ पंतवर १ सामन्याची बंदी घातली गेली होती. त्याच्याऐवजी अक्षर पटेल संघाचं नेतृत्व करण्यासाठी मैदानावर उतरला. या सामन्यादरम्यान विराट कोहली रिषभ पंतवर भाडकल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रिषभ पंत जेव्हा मैदानावर असताना त्यावेळी तो अनेकदा विरोधी संघातील खेळाडूंची पायखेची करताना दिसून येतो. मात्र यावेळी तो मैदानावर नव्हता मग विराट त्याच्यावर का भडकला ? असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल ना? तर विराट कोहली ज्यावेळी फलंदाजी करत होता. त्यावेळी रिषभ पंत डगआऊटमध्ये उभा राहुन हसत होता. हे पाहून विराट भडकला आणि त्याने त्याला बॅट दाखवत, ' बॅटने मारेन..' असे म्हटले.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विराट कोहली फलंदाजी करतोय. त्यावेळी रिषभ पंत हा साईट स्क्रीनच्या जवळ उभा असतो. त्यामुळे विराटला एकाग्र होऊन फलंदाजी करता येत नाही. रिषभला पाहून विराट कोहली त्याला बॅटने मारण्याचा इशारा करतो. त्यानंतर रिषभ पंत आपल्या जागेवर जाऊन बसतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavatmal Farmer : सरकारने जमा केलेली रक्कम शेतकऱ्यांने केली परत; अतिवृष्टीची तुटपुंजी मदत दिल्याने शेतकरी संतप्त

Amruta Khanvilkar Tattoo: अभिनेत्री अमृता खानविलकरच्या हातावर गोंदवलेला खास टॅटू कोणत्या व्यक्तीचा आहे?

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यातील 6 पंचायत समित्यांच्या सभापदी पदाचे आरक्षण जाहीर

Accident News : फुटबॉलपटूचा भीषण अपघात; दुखापतीमुळे शस्त्रक्रिया, १० महिने चालता येणार नाही

Pawan Singh: पिल्स खायला दिल्या, अबॉर्शन करायला भाग पाडलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचे धक्कादायक आरोप

SCROLL FOR NEXT