गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलचा ६५ वा सामना खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाचा दारुण पराभव झाला. पंजाब किंग्जने पाच विकेटने हा सामना जिंकला. राजस्थानने सलग चौथ्या सामना गमावलाय. सॅम करनने पंजाबसाठी मॅच विनिंग इनिंग खेळली. संजू सॅमसनचा संघ फलंदाजीत सपशेल अपयशी ठरला. या सामन्यात राजस्थानच्या गोलंदाजांनी संघाला जिवंत ठेवले असले तरी अखेरीस आशुतोष शर्मा आणि कर्णधार सॅम करन यांनी शानदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. आता पंजाबचा संघ हैदराबादसोबत भिडणार आहे. तर राजस्थानचा सामना केकेआरसोबत होणार आहे.
राजस्थान रॉयल्स संघाला १४४ धावांवर रोखल्यानंतर आव्हानाचा पाठलाग पंजाबचा संघ मैदानात आला. पंजाब संघाने राजस्थानचं आव्हान १८.५ षटकात ५ विकेट गमावत पार केलं. कर्णधारपदाची जबाबादारी संभाळत सॅम करनने अर्धशतक करत संघाल विजय मिळवून दिला. पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सचा ५ विकेट्सने पराभव केला. राजस्थानचा हा सलग चौथा पराभव आहे. पंजाबचा कर्णधार सॅम करनने ४१ चेंडूत नाबाद ६३ धावा केल्या. आशुतोष शर्मा १७ धावा करून नाबाद राहिला. रिले रोसोव आणि जितेश शर्मा यांनी प्रत्येकी २२ धावा करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
कॅप्टन सॅम करन हा पंजाबच्या विजयाचा हिरो ठरला. प्रथम गोलंदाजी करताना त्याने २ मोठे बळी घेतले. त्याने यशस्वी जयस्वाल आणि ध्रुव जुरेलला तंबूत पाठवलं. फलंदाजीला आलेल्या पंजाबची सुरुवात खूपच खराब झाली. पंजाबने ४८ धावांवर ४ विकेट गमावल्या होत्या. पण सॅम करन संघाचा डाव सावरत ४१ चेंडूत ५ चौकार आणि ३ शानदार षटकारांसह ६३ धावा केल्या. सॅमच्या या कामगिरीमुळे पंजाबने या मोसमाचा शेवट विजयाने केला.
पंजाबकडून पराभव मिळाल्यानंतर राजस्थान संघाच्या पॉईंट्समध्ये घसरण झालीय. विजय मिळाला असता तर राजस्थान रॉयल्सला १८ गुण मिळविण्याची संधी होती, परंतु या पराभवामुळे त्यांच्याकडे केवळ १६ गुण झाले आहेत. आता त्याचा पुढचा सामना १९ मे रोजी कोलकाता नाइटरायडर्सविरुद्ध होणार आहे. ही स्पर्धा खूप कठीण असेल. जर राजस्थान रॉयल्स या सामन्यात पराभूत झाला, तर ते टॉप-२ स्थान गमावू शकतात कारण सन रायझर्स हैदराबादचे अद्याप २ सामने बाकी आहेत. ते सध्या १४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत. त्यांचे दोन्ही सामने जिंकून, सनरायझर्स १८ गुणांसह दुसरे स्थान काबीज करू शकते .
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.