Rohit Sharma MI viral video saam tv
Sports

Rohit Sharma: मला आता गरज नाही...! मुंबई इंडियन्ससोबत खूश नाहीये रोहित शर्मा? झहीर खानशी बोलतानाचा Video व्हायरल

Rohit Sharma MI viral video: लखनऊमधील एकाना स्टेडियमवर हा सामना पार पडणार असून संध्याकाळी ७.३० वाजता दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. सामना सुरु होण्याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज आयपीलमध्ये लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. लखनऊच्या एकाना स्टेडियममध्ये हा सामना रंगणार असून संध्याकाळी ७.३० वाजता हा या टीम आमने-सामने येणार आहेत. दरम्यान या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि खेळाडू ऋषभ पंतचा चाहत्यांना आवडणारा असा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पंत रोहित शर्मा मागून मिठी मारताना दिसतोय.

रोहित शर्माचा व्हिडीओ झाला व्हायरल

या सामन्यापूर्वी रोहित शर्मा लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक झहीर खान याच्याशी बोलत होता. रोहित आणि झहीर एकमेंकांचे चांगले मित्र असून त्यांच्या मैत्रिची ही व्हिडिओ क्लिप लवकरच व्हायरल झाली. व्हिडिओमध्ये रोहित शर्माला असं म्हणताना ऐकू येतंय की, 'मला जे करायचं होतं ते मी केलं. मला आत्ता काहीही करण्याची गरज नाही." रोहितचं हे वाक्य संपताच ऋषभ पंत त्याला मागून मिठी मारतो आणि गंमतीने 'हो!' असं म्हणतो.

शार्दूल ठाकुरलाही भेटला रोहित

या सामन्यापूर्वी प्रॅक्टिस करताना रोहित शर्मा शार्दूल ठाकूरला भेटल्याचाही व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये शार्दुल ठाकूर समोरून येत असताना रोहित शर्माकडे पाहून 'रोहित शर्मा मैदानामध्ये फक्त एकाच व्यक्तीला भेटायला येतो.. तो म्हणजे द लॉर्ड!' असं म्हणतो. यानंतर रोहित मस्करीमध्ये 'स्वत:लाच लॉर्ड म्हणतोस' असं त्याला विचारतो. यावेळी शार्दूल देखील 'तूच माझं हे नावं ठेवलंय' असं म्हणतो.

रोहितच्या खेळीवर असणार चाहत्यांचं लक्ष

मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स आज भिडणार आहेत. या सामन्यामध्ये सर्वांच्या नजरा रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांच्या कामगिरीवर असणार आहेत. पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सची या सिझनमची आतापर्यंत चांगली कामगिरी झाली नाही. मुंबईला यावेळी तीन सामन्यांतून त्यांचे फक्त दोन पॉईंट्स मिळाले आहेत. भारतीय कर्णधार रोहित शर्माचा खराब फॉर्म मुंबईसाठी चिंतेचा विषय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

Crime News : घरगुती वाद टोकाला गेला, निवृत अधिकाऱ्याने कुटुंबीयावर गोळ्या झाडल्या; मुलाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT