Ajinkya Rahane: हा सामना जिंकणं आमच्यासाठी...; दुसऱ्या विजयानंतर काय म्हणाला अजिंक्य रहाणे? 'या' खेळाडूंना दिलं क्रेडिट

Ajinkya Rahane Reaction: गुरुवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने आले. या लढतीत हैदराबादला लाजीरवाणा पराभव सहन करावा लागला.
Ajinkya Rahane
Ajinkya Rahanesaam tv
Published On

गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा ८० रन्सने पराभव केला. या मोठ्या विजयानंतर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे खूश होता.

ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करत सहा विकेट गमावून २०० रन्स केले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची टीम अवघ्या १२० रन्सवर गारद झाली.

Ajinkya Rahane
KKR VS SRH Live : ईडन गार्डन्सवर 'RRR' चा धमाका, व्यकंटेशची स्फोटक फलंदाजी

विजयानंतर काय म्हणाला अजिंक्य रहाणे?

सनरायझर्स हैदराबादवर ८० रन्सने विजय मिळवल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला की, हा सामना आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. मोठ्या फरकाने जिंकणे आणि जिंकणंही महत्त्वाचं होतं. आम्हाला या विकेटवर प्रथम गोलंदाजी करायची होती. मात्र टॉस गमावल्यानंतर आम्हाला प्रथम फलंदाजी करावी लागली.

Ajinkya Rahane
KKR vs SRH IPL 2025: ईडन गार्डनवर हैदराबादचा सूर्य माळवला; १६ व्या षटकात गाशा गुंडाळला

रहाणे पुढे म्हणाला की, दोन विकेट गमावल्यानंतर डाव सारवण्याबाबत चर्चा झाली जेणेकरून विकेट हातात असतील तर ११व्या-१२व्या ओव्हरनंतर येणारे फलंदाज पटापट रन्स करू शकतील. आम्ही चुकांमधून खूप काही शिकलो आहोत.

Ajinkya Rahane
IPL 2025 Points Table: हैदराबादच्या पराभवाचा मुंबई इंडियन्सला फटका; मुंबईचा क्रम घसरला

गोलंदाजांचं केलं कौतुक

आपल्या गोलंदाजांचे कौतुक करताना रहाणे म्हणाला, 'आमच्याकडे तीन फिरकी गोलंदाज आहेत. दुर्दैवाने मोईन नव्हता मात्र सुनील नरेन आणि वरुणने चांगली गोलंदाजी केली. वैभव आणि हर्षित यांनीही चांगली कामगिरी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com