
IPL 2025 KKR VS SRH Live : कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना सुरु आहे. या सामन्यात हैदराबाद संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. घरच्या स्टेडियमवर खेळताना कोलकाताच्या संघाने एकूण २०० धावा केल्या. हैदराबादला सामना जिंकण्यासाठी २०१ धावा कराव्या लागणार आहेत.
क्विंटन डी-कॉक आणि सुनील नारायण हे दोन केकेआरचे सलामीवीर मैदानात उतरले. पण दोघेही स्वस्तात आउट झाले. डी-कॉकने १ धाव केली. तर सुनील नारायण ७ धावांवर बाद झाला. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी यांनी खेळ सावरण्याचा प्रयत्न केला. रहाणे ३८ धावांवर आउट झाला. रघुवंशीने अर्धशतकीय खेळी केली. व्यंकटेश अय्यर आणि रिंकू सिंहने मोर्चा सांभाळला. अय्यरने स्फोटक ६० धावा केल्या. रिंकूने ३२ धावा केल्या. व्यंकटेश अय्यर व्यतिरिक्त रहाणे, रघुवंशी आणि रिंकू या RRR च्या त्रिकूटामुळे केकेआरने २०० धावा केल्या.
सुरुवातीलाच पॅट कमिन्सने डी-कॉकला बाद केले. पुढे दुसऱ्या ओव्हरमध्ये सुनील नारायण मोहम्मद शमीने टाकलेल्या बॉलवर कॅचआउट झाला. सेट झालेल्या रहाणेला झीशान अन्सारीने माघारी पाठवले. त्याच्यापाठोपाठ रघुवंशी देखील बाद झाला. सुरुवातीला केकेआरवर दबाव टाकणाऱ्या हैदराबादची सामन्यावरची पकड मधल्या ओव्हर्समध्ये सुटली.
कोलकाता नाईट रायडर्सची प्लेईंग ११ -
क्विंटन डी-कॉक, सुनील नारायण, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंह, अंगकृष रघुवंशी, मोईन अली, आंद्रे रसेल, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, रमणदीप सिंह.
सनरायजर्स हैदराबादची प्लेईंग ११ -
अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, हेनरिक क्लासेन, कामिंदू मेंडिस, सिमरजीत सिंह, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, मोहम्मद शमी, झीशान अन्सारी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.