Hrithik Shokeen And Nitish Rana Twitter
Sports

Fights In IPL: मुबंईच्या मैदानावर दिल्लीकरांचा तुफान राडा! सामन्यानंतर झाली मोठी कारवाई

Hrithik Shokeen And Nitish Rana Fight: या सामन्यात मैदानात तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाले होते. नेमकं काय घडलं जाणून घ्या.

Ankush Dhavre

IPL 2023: रविवारी आयपीएल स्पर्धेतील २२ वा सामना Mumbai Indians आणि Kolkata Knight Riders या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने जोरदार कामगिरी करत ५ गडी राखून विजय मिळवला.

दरम्यान या सामन्यात मैदानात तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाले होते. नेमकं काय घडलं जाणून घ्या.

सामना सुरु असताना ह्रितिक आणि नितीश राणा आमने- सामने

मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली. दरम्यान Hrithik Shokeen आणि Nitish Rana यांनी या सामन्याचं तापमान आणखी वाढवलं. तर झाले असे की, हा सामना सुरु असताना ह्रितिक शौकीन गोलंदाजी करत होता.

त्यावेळी त्याच्या गोलंदाजीवर कोलकाताचा कर्णधार नितीश राणा रमनदीप सिंगच्या हातून झेल बाद झाला. तो बाद होऊन माघारी जात असताना २२ वर्षीय ह्रितिक शौकीन काहीतरी बोलताना दिसून आला. हे शब्द ऐकताच नितीश राणा देखील स्वतःला आवरू शकला नाही.

नितीश राणा त्याला बॅट दाखवताना दिसून आला होता. त्यावेळी कर्णधार सूर्यकुमार यादव मध्यस्थी करण्यासाठी आला त्यामुळे हा वाद थांबला. (Hrithik Shokeen And Nitish Rana Fight)

मॅच रेफ्रीची दोघांवर कारवाई..

मॅच रेफ्रीने या घटनेची दखल घेत दोघांवर कारवाई केली आहे. कर्णधार नितीश राणावर सामन्याच्या २५ टक्के तर ह्रितिक शौकीनवर सामन्याच्या १० टक्के दंड आकारला गेला आहे.

नितीश आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल वन गुन्ह्याच्या अनुच्छेद २.२१ चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळून आला आहे. तर ह्रितिक शौकीन आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल वन गुन्ह्याच्या कलम २.५ चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळून आला आहे.(Latest sports updates)

तसेच या सामान्याबद्दल बोलायचं झालं तर, मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथमी फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून वेंकटेश अय्यरने सर्वाधिक १०४ धावांची खेळी केली.

तर आंद्रे रसलने २१ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने २० षटक अखेर ६ गडी बाद १८५ धावा केल्या होत्या.

तर या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाकडून ईशान किशनने ५८ आणि सूर्यकुमार यादवने ४३ धावांची खेळी करत मुंबई इंडियन्स संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime News: फसवणूक प्रकरण: कल्याणमधील डॉक्टर बंटी बबलीला न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Manoj Jarange Patil: आखण्यात आला होता जिवे मारण्याचा कट, तरीही मनोज जरांगेंनी नाकारलं पोलीस संरक्षण; काय आहे कारण?

Aadhaar Card Update: आधार कार्डमध्ये येईल QR कोड; काही सेकंदात होतील बँकेची कामे

Sangli Accident : अपघाताचा थरार, भरधाव ऊसाच्या ट्रॅक्टरची धडक; ST बस ओढापत्रात कोसळली

निवडणूक आयुक्त अमित शाहांचे पाया पडले? नेमके प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT