heinrich klaasen stumping on bhuvneshwar kumar bowling to get wicket of shikhar dhawan watch video amd2000 twitter
क्रीडा

Heinrich klaasen Stumping: १४० किमीचा स्विंग होणारा चेंडू अन् हेनरिकची 'क्लासिक' स्टम्पिंग! गब्बरही झाला शॉक- Video

Ankush Dhavre

Heinrich klaasen Stumping Video:

आयपीएल २०२४ स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेतील २३ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या अटीतटीच्या लढतीत पंजाब किंग्ज संघाला २ धावांनी पराभवाचा सामना करवा लागला आहे. या सामन्यातील शेवटच्या षटकात पंजाब किंग्ज संघाला विजयासाठी २९ धावांची गरज होती.

या धावांचा पाठलाग करताना पंजाबने २६ धावांपर्यंत मजल मारली. मात्र विजयापासून ३ धावांनी वंचित राहावं लागलं. या सामन्यात शशांक सिंग, नितीश कुमार आणि आशुतोषसोबत आणखी एक खेळाडू चर्चेत राहिला, तो म्हणजे हेनरिक क्लासेन. त्याने भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर भन्नाट स्टम्पिंग केली. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाची गोलंदाजी सुरु असताना ५ वे षटक टाकण्यासाठी भुवनेश्वर कुमार गोलंदाजीला आला. या षटकातील पाचव्या चेंडूवर शिखर धवनने पुढे येऊन कव्हर ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हेनरिक क्लासेन क्लोज किपिंग करत होता.

शिखर धवन शॉट खेळण्यासाठी पुढे येताच भुवनेश्वर कुमारने गुड लेंथवर चेंडू टाकला जो टप्पा पडून बाहेर निघाला आणि क्लोज किपिंग करत असलेल्या हेनरिक क्लासेनच्या हातात गेला. त्याने क्षणाचाही विलंब न करता यष्ट्या उधळल्या आणि त्याला बाद करत माघारी धाडलं. धवनला या डावात केवळ १४ धावा करता आल्या.

शेवटच्या षटकात पंजाबचा पराभव...

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकला आणि सनरायझर्स हैदराबाद संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. सनरायझर्स हैदराबाद संघाकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना नितीश कुमार रेड्डीने सर्वाधिक ६४ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तर अब्दुल समदने २५ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर सनरायझर्स हैदराबाद संघाने २० षटकअखेर ९ गडी बाद १८२ धावा केल्या. (Cricket news in marathi)

या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्ज संघाकडून शशांक सिंगने नाबाद ४६ धावांची खेळी केली. तर आशुतोष शर्माने नाबाद ३३ धावांची खेळी केली. पंजाबला शेवटच्या षटकात विजयासाठी २९ धावा करायच्या होत्या. मात्र पंजाबला २६ धावा करता आल्या. हा सामना पंजाबला केवळ २ धावांनी गमवावा लागला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

SCROLL FOR NEXT