लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेला, पण परतलाच नाही; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Lalbaugcha Raja Darshan: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी घराबाहेर पडत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.... लालबागच्या दर्शनासाठी पुण्याहून मुंबईला आलेल्या एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय...या तरुणाचा जीव का गेलाय? दर्शन रांगा जीवावर का उठू लागल्या आहेत? पाहूयात हा रिपोर्ट.
LALBAUGCHA RAJA DARSHAN CROWD
LALBAUGCHA RAJA DARSHAN CROWDsaam tv
Published On

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी होणारी ही गर्दी काही नवीन नाही... दरवर्षी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक श्रद्धेनं बाप्पाच्या दर्शनासाठी लालबागमध्ये दाखल होतात...मात्र लालबागच्या बाप्पाची प्रसिदधी आणि दर्शनाला येणाऱ्या भाविकांची गर्दी आता वर्षागणिक वाढत चाललीय... त्यामुळे कुठे मंडाळांचे कार्यकर्त्यांची मुजोरी करताना दिसतात... तर कुठे गर्दीत चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होते...

अशातच 17 सप्टेंबरला लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पुण्याहून आलेल्या जयदीप नेमाडे या 25 वर्षीय तरुणाचा गुदमरून मृत्यू झालाय... आणि जयदीपच्या मृत्यूचं कारण ठरलीय... लालबागच्या राजाच्या रांगामधली गर्दी....

जयदीप दर्शनासाठी अनेक तासांपासून रांगेत उभा होता..त्याचवेळी त्याला अस्वस्थ वाटू लागलं...त्यानंतर रुग्णालयात दाखल करताच हद्यविकाराच्या झटक्य़ानं जयदीपचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं... त्यामुळे नेमाडे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळलाय...

यंदाच्या गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी उसळली आहे. लांबच लांब रांगा आणि प्रचंड गर्दीमुळे भाविकाना तासनतास उभं राहावं लागतं...त्यामुळे आता ही गर्दी भाविकांच्या जीवावर उठू लागलीय. त्यामुळे घरच्या गणपतीची मनोभावे पूजा करून स्वत:ला सुरक्षित ठेवणं महत्त्वाची आहे की शेकडो किलोमीटरचा प्रवास करून गर्दीत स्वत:चा जीव धोक्यात घालणं याचा विचार करण्याची गरज आता निर्माण झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com