

आधार-आधारित पडताळणीचा उद्देश पात्र लाभार्थ्यांपर्यंत सबसिडी पोहोचवणे
केंद्र सरकारच्या घोषणेनुसार हा नियम 1 ऑक्टोबर 2026 पासून लागू होईल.
सिलेंडर बुक करण्यासाठी बायोमेट्रिक आधार ऑथेटिंकेशन पूर्ण करणे आवश्यक
घरगुती वापराच्या अनुदानित एलपीजी सिलेंडर बुकिंगसंदर्भात केंद्र सरकारने नवा निर्णय लागू केलाय. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वाय मंत्रालयाने यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. आता अनुदानित घरगुती वापराच्या सिलेंडर बुकिंगसाठी ऑथेटिंकेशन करावे लागणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने जाहीर केलेल्या आपल्या प्रसिद्धीपत्रकानुसार '१ ऑक्टोबर २०२६ पासून घरगुती LPG ग्राहकांना लागू असलेल्या सबसिडीसह नियंत्रित किरकोळ विक्री किमतीत सिलेंडर बुक करण्यासाठी बायोमेट्रिक आधार ऑथेटिंकेशन पूर्ण करणे आवश्यक असेल.'
मंत्रालयाने म्हटलंय की,"BAA अर्थात बायोमेट्रिक आधार ऑथेटिंकेशन हे सबसिडी असलेला LPG खऱ्या आणि गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचेल याची खात्री करण्यासाठी केले जात आहे. प्रत्येक एलपीजी जोडणी आधार प्रमाणित ग्राहकाशी जोडल्याने सबसिडी असलेल्या घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी होणारा गैरवापर यातून टाळला जाणार आहे. यासह दुबार आणि अपात्र एलपीजी कनेक्शन बंद केले जातील. सबसिडीचे वितरण पारदर्शक आणि अचूकपणे होईल. तसेच योग्य कुटुंबाला LPG नाकारणे हा या प्रक्रियेचा उद्देश नाही. असेही केंद्राने म्हटले आहे.
सिलेंडरच्या वितरणाच्या वेळी: वितरण करणारी व्यक्ती मोबाईल ॲपचा वापर करून तिथेच ऑथेंटिकेशन करू शकतात.
वितरकाच्या डिस्ट्रिब्यूटर शोरूममध्ये: बायोमेट्रिक पडताळणी करण्यासाठी ग्राहक थेट त्यांच्या एलपीजी (LPG) वितरकाच्या (एजन्सीच्या) शोरूमला भेट देऊ शकतात.
ओएमसी (OMC) मोबाईल ॲप्सद्वारे: ग्राहक कंपन्यांच्या अधिकृत ॲप्सचा वापर करून, घरबसल्या स्वतःहून ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
Indane ग्राहक: IndianOil ONE ॲप
Bharatgas ग्राहक: HelloBPCL ॲप
HP Gas ग्राहक: HP PAY ॲप
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.