Maratha Reservation: जुन्या नोंदी, कागदपत्रांच्या अडचणींवर तोडगा निघाला; मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

Maratha Reservation: मराठा आरक्षण संदर्भात सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी स्तरावर स्वतंत्र उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
Maharashtra government decision on Maratha Kunbi certificate documents
Maharashtra government decision on Maratha Kunbi certificate documentssaam tv
Published On
Summary
  • मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी स्तरावर उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात येणार

  • राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची छत्रपती संभाजीनगर येथे भेट घेऊन या निर्णयाची माहिती दिली.

  • कुणबी प्रमाणपत्र देताना संबंधित पुरावे, नोंदी आणि लागू नियमांची पूर्तता आवश्यक राहणार आहे.

मराठा समाजासाठी मोठी बातमी आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार कामाला लागलंय. ओबीसी नोंदी मिळवण्यात अडचणी येत असल्यानं अनेकांना कुणबी प्रमाणपत्र मिळत नाहीये. जुन्या नोंदी, कागदपत्रांच्या अडचणींवर दूर करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. सरकार आता मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात उच्चाधिकार समिती स्थापन केली जाणार आहे. याबाबतीची माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलीय. (Maratha Kunbi Certificate: Marathwada District-level Committees To Address Record Issues)

दरम्यान उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेत आहेत. उपोषणामुळे अशक्तपणा आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. शुक्रवारच्या रात्री जरांगे पाटील यांची तब्येत अचानक बिघडली होती, त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज शनिवारी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांची भेट घेतली. जरांगेच्या तब्येतची विचारसपूस करत मराठा आरक्षणासाठी सरकार करत असलेल्या कामांची माहिती दिलीय.

या भेटीत विखे पाटील यांनी राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी जातीचीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती माध्यमांना दिली. सरकार आता मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र उच्चाधिकार समिती स्थापन करणार आहे. या समिती जिल्हाधिकारी स्तरावर मराठा आरक्षणासाठी कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी, जुन्या नोंदी आणि आवश्यक कागदपत्रे उपल्बध करून देतील.

जुनी कागदपत्रे आणि नोंदी शोधण्यात अनेक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे प्रमाणपत्रांचे वाटप करता येत नव्हते. यावर सरकारने कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. या समितीला कुणबी जात प्रमाणपत्राबाबत आवश्यक अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठीची कागदपत्रे, त्यासंदर्भातील नोंदी सहज उपलब्ध होतील, असा दावा विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com