EPFO On WhatsApp: EPFO चं WhatsApp चॅनेल! PF-पेन्शनचे अपडेट्स मिळणार थेट मोबाइलवर; जॉइन करण्याची A to Z प्रोसेस जाणून घ्या

EPFO WhatsApp Updates: EPFO च्या अधिकृत WhatsApp चॅनेलवर PF, पेन्शन, योजना आणि महत्त्वाचे अपडेट्स मिळतील. लिंक किंवा QR कोडच्या मदतीने चॅनेल Follow करता येईल.
EPFO WhatsApp
EPFO WhatsAppmeta ai
Published On

कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) आपल्या सदस्य आणि पेन्शनधारकांसाठी अधिकृत WhatsApp चॅनेल सुरू केले आहे. या चॅनेलच्या माध्यमातून आता पीएफ, पेन्शन सेवा, विविध योजना आणि संस्थेकडून जाहीर करण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या अपडेट्सची माहिती थेट मोबाइलवर मिळणार आहे. त्यामुळे EPFO शी संबंधित ताज्या घडामोडी जाणून घेणे सदस्यांसाठी जास्त सोपं होणार आहे.

१ लाखांहून जास्त फॉलोअर्स

EPFO च्या WhatsApp चॅनेलची सुरुवात १९ ऑगस्ट २०२५ रोजी झाली होती. सप्टेंबर २०२६ मध्ये या चॅनेलने १ लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केला. EPFO ने सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती देत सदस्यांच्या विश्वासाबद्दल आभार मानले आहेत.

EPFO WhatsApp
8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना जॅकपॉट लागण्याची शक्यता! ३.२५ फिटमेंट फॅक्टरची मागणी; Level-10 मुळे पगार किती वाढणार?

EPFO WhatsApp चॅनेलला कसे जॉइन कराल?

EPFO चॅनेलशी जोडण्यासाठी दोन सोपे ऑप्शन आहेत.

पहिला पर्याय: WhatsApp मधील अधिकृत EPFO चॅनेलच्या लिंकवर जाऊन Follow या पर्यायावर क्लिक करा.

दुसरा पर्याय: EPFO ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेला QR कोड मोबाइलच्या कॅमेऱ्याने किंवा WhatsApp स्कॅनरच्या मदतीने स्कॅन करा. त्यानंतर EPFO WhatsApp चॅनेलवर जाऊन Follow करा.

EPFO WhatsApp
ST Bus : ST प्रवाशांसाठी मोठी बातमी! NCMC कार्डच्या नियमांत बदल; बायोमेट्रिक फेल झाल्यास आधार OTPचा पर्याय

या चॅनेलवर काय माहिती मिळणार?

या WhatsApp चॅनेलवर EPFO कडून जारी करण्यात येणारे महत्त्वाचे अपडेट्स, EPF आणि पेन्शन सेवांशी संबंधित माहिती, योजना आणि महत्त्वाच्या घोषणा मिळणार आहेत. मात्र, PF Balance Check, खात्याशी संबंधित नियमित सेवा किंवा PF Money Withdrawal यांसारखी कामे या WhatsApp चॅनेलवर करता येणार नाहीत. त्यासाठी EPFO च्या अधिकृत पोर्टल किंवा UMANG App चा वापर करावा लागेल. तसेच तक्रारींसाठी संबंधित EPFO कार्यालय किंवा अधिकृत हेल्पलाइनचा वापर करणे आवश्यक आहे.

थोडक्यात, WhatsApp चॅनेलचा मुख्य उद्देश माहिती आणि अपडेट्स सहज उपलब्ध करून देणे हा आहे; खात्याशी संबंधित व्यवहार करण्यासाठी अधिकृत EPFO सेवा प्लॅटफॉर्मच वापरावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com