Happy Birthday Bhuvneshwar Kumar: 'स्विंग चा किंग' म्हणून ओळखला जाणारा भुवनेश्वर कुमार सध्या काय करतो?

HBD Bhuvneshwar Kumar: भारतीय संघाचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमार आज आपला ३४ वा वाढदिवस साजरा करतोय.
bhuvneshwar kumar
bhuvneshwar kumaryandex

Happy Birthday Bhuvneshwar Kumar:

सध्या भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टनमच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात एकमेव वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची जादू पाहायला मिळत आहे.

तर मुकेश कुमार पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वीच मोहम्मद शमीने मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघाला अशा एका गोलंदाजाची गरज आहे,जो बुमराहला (Jasprit Bumrah) चांगली साथ देईल.

भारतीय संघात असा एक गोलंदाज आहे,ज्याला एकेकाळी स्विंग चा किंग असं म्हटलं जायचं. आम्ही कोणाबद्दल बोलतोय याची कल्पना तर तुम्हाला आलीच असेल. आम्ही बोलतोय मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारबद्दल. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आज आपला ३४ वा वाढदिवस साजरा करतोय.

टी-२०, वनडे आणि कसोटी कारकिर्दीची सुरुवात दांडी गुल करुन करणाऱ्या या गोलंदाजाला संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. २०१८ मध्ये तो शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. त्यानंतर २०२२ मध्ये तो आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. त्यानंतर दुखापतीमुळे त्याला मैदानापासून दूर राहावं लागलं होतं. काही महिन्यांपूर्वी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये कमबॅक केलं आहे. मात्र त्याची भारतीय संघात कमबॅक करण्याची वाट जरा कठीणच आहे.

असा राहिलाय रेकॉर्ड..

भुवनेश्वर कुमारच्या रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर त्याने, २१ कसोटी सामन्यांमध्ये ६३ गडी बाद केले आहेत. तर ८७ टी-२० सामन्यांमध्ये ९० आणि १२१ वनडे सामन्यांमध्ये १४१ गडी बाद केले आहेत.

सामना भारतात असो की परदेशात, खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल असो की वेगवान गोलंदाजीसाठी. भुवनेश्वर कुमारकडे पहिल्या चेंडूपासूनच चेंडू स्विंग करण्याची कला आहे. त्याने वनडे, टी-२० आणि कसोटी कारकिर्दीची सुरुवात यष्टी उधळूनच केली होती.

भुवनेश्वर कुमारने २०१२ मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याने पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानी फलंदाजाची दांडी गुल केली होती. चेंडू स्विंग करायची कला असली तरीदेखील गती नसल्याने अनेकदा त्याच्यावर टीका देखील केली गेली आहे. केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नव्हे तर आयपीएल स्पर्धेतही त्याचा जलवा पाहायला मिळाला आहे.

भुवनेश्वर कुमार सध्या काय करतो?

भारतीय संघाबाहेर असलेला भुवनेश्वर कुमार सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळतोय. यूपी संघाचं प्रतिनिधित्व करत असलेल्या भुवनेश्वर कुमारने या स्पर्धेतील २ सामन्यांमध्ये १३ गडी बाद केले आहेत. यापूर्वी झालेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील ५ सामन्यांमध्ये त्याने ११ गडी बाद केले होते. येत्या काही दिवसात आयपीएल २०२४ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत तो सनरायझर्स हैदराबाद संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com