IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेसाठी Sunrisers Hyderabad ने केली नव्या कर्णधाराची घोषणा

ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघाने मोठी घोषणा केली आहे.
Sunrisers Hyderabad
Sunrisers HyderabadSaam Tv
Published On

Sunrisers Hyderabad New Captain: लवकरच क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठी लीग स्पर्धा इंडीयन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना ३१ मार्च रोजी पार पडणार आहे. दरम्यान ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघाने मोठी घोषणा केली आहे.

दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज एडन मार्करम यावेळी सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. एडन मार्करमच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका टी -२० लीग स्पर्धेत सनरायझर्स ईस्टर्न केप संघाला जेतेपद मिळवून दिले होते.(Latest Sports Updates)

Sunrisers Hyderabad
IND vs AUS ODI : भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात मोठे बदल; ३ तगड्या खेळाडूंची वापसी

तर २०१६ मध्ये झालेल्या आयपीएल (IPL) स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाला जेतेपद मिळवून दिलेला कर्णधार केन विलियमसनला हे हंगाम सुरू होण्यापूर्वी रिलीज करण्यात आले होते. त्यांनतर भुवनेश्वर कुमार, मयांक अगरवाल आणि एडन मार्करम यांच्यात कर्णधारपदासाठी स्पर्धा सुरू होती.

अखेर एडन मार्करमने बाजी मारली आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने त्याच्यावर विश्वास दाखवला आहे. तो आपल्या संघाला जेतेपद मिळवून देणार का. हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

Sunrisers Hyderabad
Ind vs Aus semi final:अंतिम फेरीत जाण्यासाठी माजी कर्णधाराने टीम इंडियाला दिला 'गुरुमंत्र'

काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिका टी -२० लीग स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात सनरायझर्स ईस्टर्न केप संघाने जेतेपद मिळवत इतिहास रचला. या स्पर्धेत मार्करमने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये मोलाचे योगदान दिले.

त्याने फलंदाजी करताना ३३६ तर गोलंदाजी करताना ११ गडी बाद केले. तसेच सेमीफायनलच्या सामन्यात त्याने अर्धशतक देखील झळकावले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com