Ind vs Aus semi final:अंतिम फेरीत जाण्यासाठी माजी कर्णधाराने टीम इंडियाला दिला 'गुरुमंत्र'

हा सामना जिंकताच भारतीय संघाला थेट अंतिम सामन्यात प्रवेश मिळणार आहे.
Indian Women Cricket Team
Indian Women Cricket TeamSaamtv

Ind vs Aus semi final:महिला टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतील सेमी फायनलच्या सामन्यात आज भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.

हा सामना जिंकताच भारतीय संघाला थेट अंतिम सामन्यात प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे महत्वाचा सामना जिंकण्यासाठी माजी भारतीय कर्णधार मिताली राजने भारतीय संघाला गुरुमंत्र दिला आहे.(Latest Sports Updates)

मिताली राजने (Mithali Raj) ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करण्यासाठी ३ फॉर्मुले सांगितले आहेत. जर भारतीय महिला संघाने मिताली राजने सांगितलेल्या फॉर्मुल्याचा वापर केला, तर नक्कीच भारतीय संघ अंतिम सामन्यात प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही.

Indian Women Cricket Team
IND vs AUS ODI : भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात मोठे बदल; ३ तगड्या खेळाडूंची वापसी

फॉर्मुला नंबर १ -

भारतीय संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर प्रथम फलंदाजी करताना १६० किंवा त्यापेक्षा अधिक धावा कराव्या लागतील.

फॉर्मुला नंबर २-

भारतीय महिला संघाला आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. कारण हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. तेही वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वात मजबूत संघाविरुद्ध.

Indian Women Cricket Team
IND Vs AUS: रवींद्र जडेजा कसोटीत रचणार इतिहास! हा मोठा विक्रम नावावर करत वर्ल्ड क्रिकेटला हादरवून सोडणार

फॉर्मुला नंबर ३-

ऑस्ट्रेलिया हा बलाढ्य संघांपैकि एक आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करण्यासाठी भारतीय संघाला तोडीस तोड खेळ करावा लागणार आहे. भारतीय संघातील खेळाडूंना फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

भारतीय संघ देखील या ३ फॉर्मुल्यांचा वापर करताना दिसून येऊ शकतात. सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ऋचा घोषने म्हटले की, "आम्ही प्रथम फलंदाजी करताना १८० धावा करण्याच्या प्रयत्नात असणार आहोत. तर प्रथम गोलंदाजी करताना १४० धावांवर ऑस्ट्रेलियाचा डाव रोखण्याच्या प्रयत्नात असणार आहोत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com