Heinrich Klaasen Retirement X
Sports

IPL 2025 मधून बाहेर पडल्यानंतर दिग्गज क्रिकेटपटूने घेतला मोठा निर्णय, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

Heinrich Klaasen Retirement : दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटून हेन्नी क्लासेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. क्लासेन तुफानी फटकेबाजी आणि उत्कृष्ट विकेटकिपिंगसाठी प्रसिद्ध आहे. तो आयपीएलमध्ये हैदराबादकडून खेळतो.

Yash Shirke

क्रिकेट जगतातून मोठी बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा अनुभवी विकेटकीपर फलंदाज हेन्नी क्लासेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी ४ कसोटी, ६० एकदिवसीय आणि ५८ टी-सामने खेळले आहेत. क्रिकेट कारकीर्दीमध्ये त्याने आक्रमक खेळी करत अनेक सामना जिंकवून दिले होते.

हेन्नी क्लासेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरीही तो लीग सामन्यांमध्ये खेळताना दिसणार आहे. क्लासेन आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादकडून खेळतो. आयपीएल २०२५ मध्ये क्लासेनने हैदराबादकडून खेळताना चांगली कामगिरी केली होती. फलंदाजीसह विकेटकिपिंगमध्येही क्लासेनने त्याचा क्लास दाखवला होता.

मागच्या वर्षी टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हेन्नी क्लासेनने शानदार फलंदाजी केली होती. अंतिम सामन्यात भारताविरुद्ध खेळताना क्लासेनने २७ चेंडूत २ चौकार आणि ५ षटकार मारत ५२ धावा केल्या होता. त्याचा खेळ पाहून भारतीयांना धडकी भरली होती. तो जोपर्यंत क्रीजवर होता, तोपर्यंत दक्षिण आफ्रिका सामना जिंकेल असे वाटत होते. क्लासेन बाद झाल्यानंतर सामना भारताच्या बाजूने वळला. टीम इंडियाने अंतिम सामना ६ धावांनी जिंकत टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले.

हेन्नी क्लासेनने दक्षिण आफ्रिकेसाटी ६० एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने ४३.६९ च्या सरासरीने त्याने २१४१ धावा केल्या. यात चार शतके आणि अकरा अर्धशतकांचा समावेश आहे. क्लासेनने ५८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने २३.२५ च्या सरासरीने एक हजार धावा केल्या. यात ५ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी फक्त ४ कसोटी सामने खेळले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT