
एका बाजूला भारतात IPL 2025 ची धामधुम सुरु आहे. दुसऱ्या बाजूला इंग्लंडमध्ये इंडिया ए आणि इंग्लंड लायन्स यांच्यात पहिला अनधिकृत कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान इंडिया एकडून खेळणारा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार १८ नंबरच्या जर्सीमध्ये दिसला. १८ नंबरची जर्सी वापरल्याने मुकेश कुमारवर विराट कोहलीचे चाहते संतापले आहेत.
मुकेश कुमारचे १८ नंबरची जर्सीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा जर्सी नंबर १८ आहे. मुकेशने १८ नंबरची जर्सी वापरायला नको होती असे विराटचे चाहते म्हणत आहेत. तर काही चाहते मुकेश कुमारला जर्सी नंबरमुळे ट्रोल करत आहेत. या जर्सी प्रकरणाची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे.
विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर विराटने टी-२० फॉरमॅटमधूनही संन्यास घेतला. आता तो एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळताना दिसणार आहे. विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत असल्याने मुकेश कुमारने कोहलीच्या १८ नंबरची जर्सी वापरली असे म्हणत चाहत्यांनी मुकेशवर हल्लाबोल केला आहे. या ट्रोलिंगमुळे विराटच्या चाहत्यांनाही ट्रोल केले जात आहे.
सचिन तेंडुलकर यांची १० नंबरची जर्सी आणि महेंद्र सिंह धोनी यांची ७ नंबरची जर्सी बीसीसीआयने निवृत्त केली आहे. याचा अर्थ १० किंवा ७ हे जर्सी नंबर इतर कोणताही खेळाडू वापरु शकत नाही. विराट कोहली एकदिवसीय फॉरमॅटमध्ये खेळत असल्याने अजूनतरी त्याचा जर्सी नंबर निवृत्त करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. येत्या काही वर्षात विराटची १८ नंबरची जर्सी निवृत्त केली जाऊ शकते.
मुकेश कुमार यापूर्वी ४९ नंबरची जर्सी घालत असे. पण त्याने बीसीसीआयकडे अधिकृतपणे जर्सी नंबर बदलण्याची विनंती केली होती. त्यामुळे मुकेशला १८ नंबरची जर्सी वापरण्यास परवानगी देण्यात आल्याचे म्हटले जात आहे. हा बदल तात्पुरत्या स्वरुपाचा आहे की यापुढेही मुकेश १८ नंबरची जर्सी वापरणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.