Glenn Maxwell retirement : आता वेळ आली आहे...; ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेलनं अचानक घेतली निवृत्ती

Glenn Maxwell retirement From ODI: ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघातील मधल्या फळीतील कणा आणि धडाकेबाज फलंदाज, पंजाब किंग्ज संघातील खेळाडू ग्लेन मॅक्सवेलनं आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली. ऑस्ट्रेलियाकडून तो चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये अखेरचा सामना खेळला होता. आयपीएलमधूनही दुखापतीमुळं माघार घेतली होती.
Glenn Maxwell retirement
Glenn Maxwell retirementsaam tv
Published On

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलनं वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मॅक्सवेलनं २ जूनला स्वतः निवृत्तीबाबत माहिती दिली. ऑस्ट्रेलियाकडून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये तो अखेरचा खेळला होता. स्टीव्ह स्मिथने देखील या स्पर्धेनंतर संन्यास घेतला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर तो आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्जकडून खेळला. पण दुखापतीमुळं काही सामन्यांनंतर त्यानं संपूर्ण स्पर्धेतून माघार घेतली होती.

मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाकडून २०१२ मध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ऑस्ट्रेलियानं दोनदा वर्ल्डकप स्पर्धा जिंकली होती. दोनदा वर्ल्ड चॅम्पियन झालेल्या संघाचं त्यानं प्रतिनिधीत्व केलं होतं. त्याची एकदिवसीय कारकीर्द जबरदस्त होती. १४९ एकदिवसीय सामन्यात त्यानं जवळपास ४००० धावा केल्या. तर गोलंदाजी करताना त्यानं ७९ विकेट्स घेतल्या.

विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलिया संघ जेव्हा जेव्हा पराभवाच्या उंबरठ्यावर असायचा त्यावेळी ग्लेन मॅक्सवेल सामना एकहाती फिरवायचा. मॅच विनर म्हणून त्याची ओळख आहे. अफगाणिस्तानविरुद्ध वर्ल्डकप २०२३ मध्ये त्यानं झळकावलेले द्विशतक आजही क्रिकेटप्रेमींच्या लक्षात आहे.

Glenn Maxwell retirement
IPL 2025 : ठरलं! पंजाब फायनलमध्ये विराटच्या सेनेशी भिडणार; आयपीएलच्या चषकावर कोण नाव कोरणार?

ग्लेन मॅक्सवेलनं निवृत्तीबाबत चीफ सिलेक्टर जॉर्ज बेली यांना आधीच कल्पना दिली होती. फेब्रुवारी-मार्चमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळी मॅक्सवेलनं २०२७ वनडे वर्ल्डकपर्यंत खेळू शकणार नाही, असं सांगितलं होतं. मला वाटत नाही की मी २०२७ च्या वर्ल्डकपपर्यंत खेळू शकेल, असं मी आधीच त्यांना सांगितलं होतं, असं फायनल वर्ड पॉडकास्टमध्ये मॅक्सवेल म्हणाला.

मला वाटतंय की आता वेळ आली आहे. माझ्या जागी इतर खेळाडूंसाठी रणनीती तयार करावी. त्यावर काम करायला हवं. २०२७ वर्ल्डकप स्पर्धेसाठी त्या खेळाडूंनी संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. योग्य पर्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, असं मॅक्सवेल म्हणाला.

मॅक्सवेलने ३९९० धावा केल्या आहेत. त्यात चार शतके आणि २३ अर्धशतके आहेत. २०१ ही त्याची वनडेतील सर्वोच्च धावसंख्या आहे. वनडे क्रिकेट इतिहासातील त्याची ही खेळी कायम स्मरणात राहणारी आहे.

Glenn Maxwell retirement
MI Vs PBKS : पंजाब किंग्सची IPL 2025 च्या फायनलमध्ये एन्ट्री! मुंबईचं सहाव्या ट्रॉफीचं स्वप्न भंगलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com