MI Vs PBKS : पंजाब किंग्सची IPL 2025 च्या फायनलमध्ये एन्ट्री! मुंबईचं सहाव्या ट्रॉफीचं स्वप्न भंगलं

MI Vs PBKS Qualifier 2 : मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स या आयपीएल २०२५ मधील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पंजाबचा विजय झाला आहे. या विजयानंतर पंजाब किंग्सने फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
MI Vs PBKS Qualifier 2
MI Vs PBKS Qualifier 2x
Published On

IPL 2025 चा क्वालिफायर २ सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव करुन पंजाब किंग्स हा संघ फायनलमध्ये गेला आहे. ३ जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स अशी लढत पाहायला मिळणार आहे. पराभवामुळे या मुंबई इंडियन्सचे आयपीएल २०२५ मधील आव्हान संपुष्टात आले आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स या सामन्यामध्ये पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर अय्यरने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना सुरु होणार तेवढ्यात पावसाला सुरुवात झाली. पाऊस थांबल्यानंतर ९.४५ च्या सुमारास सामना सुरु झाला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या फलंदाजांनी २० ओव्हर्समध्ये २०३ धावा केल्या. पंजाबने २०४ धावांचे लक्ष्य अठराव्या ओव्हरमध्ये पूर्ण केले.

रोहित शर्मा आणि जॉनी बेअरस्टो ही सलामीची जोडी मैदानात उतरली. रोहित लवकर बाद झाला. पण बेअरस्टोने बाजी सांभाळली, त्याने ३८ धावा केल्या. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी चांगली भागीदारी करत एकूण ८८ धावा (प्रत्येकी ४४) केल्या. शेवटच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी करत नमन धीरने ३७ धावा केल्या. पंजाबकडून अजमातुल्ला ओमरझाईने दोन विकेट्स घेतल्या. चहल, जेमिसन, विजयकुमार वैशाख आणि मार्कस स्टॉयनिस यांनी प्रत्येकी १ अशा चार विकेट्स घेतल्या.

२०४ धावांचे लक्ष्य गाठताना पंजाबकडून प्रभसिमरन सिंह आणि प्रियांश आर्य सलामीला आले. प्रियांशने २०, तर प्रभसिमरनने ६ धावा केल्या. जोश इंग्लिस २१ धावा करुन माघारी परतला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि नेहाल वढेरा यांनी खेळ सावरला. नेहाल वढेरा २८ धावांवर कॅचआउट झाला. शशांक सिंह २ धावांवर रनआउट झाला. शेवटपर्यंत चौथ्या क्रमावर आलेला श्रेयस अय्यर शेवटपर्यंत टिकून राहिला, त्याने पंजाबला विजय मिळवून दिला. अय्यरने २१२ च्या स्ट्राईक रेटने ४१ चेंडूत ८७ धावा केल्या. यात आठ षटकार आणि पाच चौकारांचा समावेश होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com