hardik pandya will be the impactfull player in icc t20 world cup 2024 says mohammed kaif amd2000 google
Sports

ICC T20 World Cup 2024: विराट,सूर्या नव्हे तर हार्दिक ठरेल मॅचविनर! माजी भारतीय खेळाडूचा दावा

Mohammed Kaif On Hardik Pandya: टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात हार्दिक पंड्यालाही भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे.

Ankush Dhavre

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात हार्दिक पंड्यालाही भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेत तो मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करतोय. मात्र या स्पर्धेत त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. तर हार्दिक पंड्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

या हंगामात तो संघाचा कर्णधार म्हणून आणि फलंदाज, गोलंदाज म्हणूनही पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्याची ही सुमार कामगिरी पाहता तो भारतीय संघासाठी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत चांगली कामगिरी करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान माजी भारतीय खेळाडू मोहम्मद कैफच्या मते हार्दिक पंड्या हा भारतीय संघासाठी इम्पॅक्ट प्लेअर ठरु शकतो.

हार्दिक पंड्या ठरणार मॅचविनर...

स्टार स्पोर्ट्सवर बोलताना तो म्हणाला की, 'मला असं वाटतं की, आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत हार्दिक पंड्या भारतीय संघासाठी मॅचविनर ठरु शकतो. तो विराट, सूर्यकुमार यादवपेक्षा जास्त छाप सोडताना दिसून येईल.' मोहम्मद कैफने उदाहरण देत म्हटले की, 'भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये मेलबर्न टी-२० मध्ये विराट कोहलीने ८२ धावांची खेळी केली होती. त्या सामन्यात हार्दिकने ४० धावांची खेळी केली होती आणि ३ गडी देखील बाद केले होते.'

तसेच तो पुढे म्हणाला की,' आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दिनेश कार्तिक आणि रविंद्र जडेजा बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्याने संघाला सामना जिंकून दिला होता. या सामन्यात त्याने नवाजची चांगलीच धुलाई केली होती.' सध्या हार्दिक पंड्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे हार्दिक पंड्यासाठी कमबॅक करणं हे हार्दिक पंड्यासमोर असलेलं सर्वात मोठं आव्हान असेल. असं मोहम्मद कैफ म्हणाला.

टी20 विश्वचषकासाठी भारतीय टीम – रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल

राखीव खेळाडू..

शुभमन गिल, रिंकू सि्ंग, खलील अहमद, आवेश खान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hotel Kitchen Food : धक्कादायक! तुमच्या जेवणात कचरा ? व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल | VIDEO

Ramayana: जगातील सर्वात भव्य महाकाव्यांचा आरंभ 'रामायण'; अभिनेता रणबीर कपूरची मोठी भूमिका

Bhoj Dam : भोज धरणावर मस्ती भोवली; पर्यटक पाण्याच्या प्रवाहात अडकला, सुदैवाने वाचला जीव

Raj Thackeray: राज ठाकरेंबाबात वादग्रस्त पोस्ट, पुण्यात मनसैनिक आक्रमक; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासांसाठी रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT