आयपीएल 2026 मध्ये हार्दिक पंड्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आलं नाही. आता आयपीएल 2027 च्या आधी हार्दिक पंड्या टीम बदलू शकतो, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हार्दिक पंड्याच्या ट्रेडबाबत बोलणी सुरू आहेत.
विशेष म्हणजे हा ट्रेड यशस्वी जायसवालच्या बदल्यात होण्याची शक्यता आहे. जर हा व्यवहार पूर्ण झाला, तर पुढील सिझनमध्ये हार्दिक पंड्या राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना दिसू शकतो. तर यशस्वी जायसवाल मुंबई इंडियन्सच्या जर्सीत मैदानात उतरताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स सोडू शकतो अशा चर्चा आयपीएल 2026 दरम्यानच सुरू झाल्या होत्या. तीन वर्षांपूर्वी त्याने गुजरात टायटन्सचा निरोप घेत मुंबई इंडियन्समध्ये कमबॅक केलं होतं. त्यानंतर रोहित शर्माच्या जागी त्याच्याकडे टीमची धुरा सोपवण्यात आली.
मात्र त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळवता आलं नाही. यंदाच्या सिझनमध्येही टीमची कामगिरीही निराशाजनक राहिली. त्यामुळे हार्दिक आणि मुंबई इंडियन्स यांचे मार्ग वेगळे होण्याची शक्यता वाढलीये.
रिपोर्ट्सनुसार हार्दिकला टीममधील सर्व खेळाडूंचा अपेक्षित पाठिंबा मिळत नव्हता. काही वरिष्ठ खेळाडू त्याला पूर्ण सहकार्य करत नसल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत नवीन वातावरण आणि नव्या संधीसाठी हार्दिकने टीम बदलण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.
दरम्यान यशस्वी जयस्वालही राजस्थान सोडण्यामागे काही कारणं असल्याचं म्हटलं जातंय. गेल्या काही सिझनध्ये राजस्थान रॉयल्ससाठी त्याने सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी केलीये. मात्र टीममधील त्याचं महत्त्व पूर्वीइतके राहिले नसल्याचे बोलले जात आहे.
राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदासाठी जायसवालचे नाव चर्चेत होते. पण टीम मॅनेजमेंटने रियान परागवर विश्वास दाखवत त्याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली. त्यामुळे जायसवालला अपेक्षित संधी मिळाली नाही.
याशिवाय राजस्थानला वैभव सूर्यवंशीसारखा आक्रमक ओपनरही मिळाला आहे. वैभव सुरुवातीपासूनच वेगवान फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे टीमच्या भविष्यातील योजनांमध्ये बदल झाल्याचं मानलं जातंय. या सर्व गोष्टींमुळे जायसवाल राजस्थान रॉयल्सपासून वेगळा होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
फक्त मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्समध्येच नव्हे, तर दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्समध्येही मोठे बदल पाहायला मिळू शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार ऋषभ पंत पुढील सिझनमध्ये पुन्हा दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसू शकतो. कुलदीप यादव दिल्लीची साथ सोडून लखनऊ सुपर जायंट्समध्ये जाण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.