Shubman Gill: गौतम गंभीरचा मास्टरप्लान! गिल-किशन जोडीनं २०२७ वर्ल्डकपचं टेन्शन मिटवलं? पाहा टीम इंडियाची नवी रणनीती

शुभमन गिल आणि इशान किशन यांच्या 224 धावांच्या भागीदारीने टीम इंडियाच्या डावखुरा–उजवा फलंदाजी कॉम्बिनेशनची ताकद दाखवली. या भागीदारीमुळे अफगाणिस्तानच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण झाला आणि 2027 वर्ल्ड कपसाठी ही रणनीती महत्त्वाची ठरू शकते.
Shubman Gill
Shubman Gillsaam tv
Published On

टीम इंडियाचा कोच गौतम गंभीर नेहमीच डावखुरा–उजव्या फलंदाजांच्या कॉम्बिनेशनवर विश्वास ठेवतो. टीम इंडियाच्या T20I रणनीतीचा पाया याच विचारावर उभा राहिलाय. ओपनर आणि टॉप ऑर्डरमध्ये अभिषेक शर्मा , इशान किशन आणि तिलक वर्मा यांसारखे डावखुरे फलंदाज असल्यामुळे गोलंदाजांच्या योजना बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो.

याच्या उलट, वनडे टीममध्ये मात्र बराच काळ उजव्या हाताच्या फलंदाजांचे वर्चस्व राहिलंय. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या काळातही हीच परिस्थिती होती आणि त्यामुळे टीम मॅनेजमेंटला अक्षर पटेल याला पाचव्या क्रमांकावर बढती देऊन बॅटिंगमध्ये थोडा बदल करावा लागला. त्यानंतर राईट-लेफ्ट कॉम्बिनेशन आणण्याबाबत चर्चा होत राहिली. पण 2023 वर्ल्ड कपनंतर वनडे टीमचा चेहरा फारसा बदलला नाही.

Shubman Gill
Rohit Sharma: मैदानात पाऊल ठेवताच रोहित शर्माचा नवा रेकॉर्ड; राहुल द्रविडलाही टाकले मागे

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका गमावल्यानंतर परिस्थिती थोडी बदलली. विराट कोहलीच्या दुखापतीमुळे टीम मॅनेजमेंटला काही नवीन प्रयोग करण्याची संधी मिळाली. याच दरम्यान इशान किशनला धर्मशालामध्ये पावसामुळे कमी झालेल्या ओव्हर्समध्ये तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आलं. पुढील सामन्यात लखनऊमध्ये यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा ओपनिंगला उतरले. ज्यामुळे शुभमन गिल याला एक डाऊनवर खेळावं लागलं.

या प्रयोगांपैकी जयस्वाल लवकर बाद झाला. पण गिल आणि इशान किशनने तिसऱ्या विकेटसाठी तब्बल 224 रन्सची पार्टनरशिप केली. ही भागीदारी संपूर्ण सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरली.

दुसऱ्या वनडेत कॅप्टन्स इनिंग

दुसऱ्या वनडे सामन्यात शुभमन गिलने उत्तम खेळ करत 110 चेंडूत 154 रन्सची खेळी केली. यात 22 चौकार आणि 2 षटकार होते. विशेष म्हणजे हे त्याचं कर्णधार म्हणून पहिलंच वनडे शतक होतं. त्याची फलंदाजी अतिशय क्लासिक होती. यावेळी त्याच्या खेळीत कव्हर ड्राईव्ह, कट आणि पुल शॉट्सची उत्तम झलक दिसली.

दुसऱ्या बाजूला इशान किशन सुरुवातीला सावध खेळला. मात्र त्यानंतर त्यानेही शुभमनची साथ दिली. त्याने 71 चेंडूत शतक पूर्ण केलं. जे त्याच्या वनडे कारकिर्दीतील दुसरं शतक होतं. त्याने अखेर 125 रन्सच्या खेळीत 14 चौकार आणि 7 सिक्स लगावले होते.

Shubman Gill
Ind vs AFG : दो भाई, दोनो तबाही... शुभमन, इशान किशनची तेजतर्रार शतके; भारतानं अफगाणिस्तानविरुद्ध उभारला धावांचा डोंगर

किशन बाद झाल्यानंतर गिलने परिस्थितीनुसार खेळ बदलला. क्रॅम्प्समुळे त्याला सिंगल्स घेणं कठीण जात होतं त्यामुळे त्याने अधिकाधिक बाऊंड्रीवर लक्ष केंद्रित केलं. तो 150 रन्सचा टप्पा ओलांडून पुढे गेला, पण शेवटी स्वीप शॉट मारताना चूक झाली आणि स्वीपर फील्डरकडे कॅच होऊन तो बाद झाला.

मधल्या आणि खालच्या फळीतील फलंदाज मात्र या मजबूत पायावर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले. जलद धावा करण्याच्या प्रयत्नात विकेट्स गमावल्या गेल्या आणि शेवटच्या टप्प्यात भारताचा रनरेट कमी झाला.

Shubman Gill
वैभव सूर्यवंशीवर कारवाईचा बडगा; सामन्याच्या मानधनात तब्बल 50 टक्के कपात, अचानक नेमकं काय घडलं?

तरीही या सामन्यातील सर्वात मोठा सकारात्मक मुद्दा म्हणजे गिल आणि किशनची भागीदारी. लेफ्ट-राईट कॉम्बिनेशन असल्यामुळे अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना सतत लाईन-लेंथ बदलावी लागली. फील्ड सेटिंगमध्ये गोंधळ निर्माण झाला आणि गोलंदाजांना स्थिरता मिळाली नाही. त्यामुळे 2027 च्या वनडे वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने हे कॉब्मिनेशन टीम इंडियासाठी फायदेशीर ठरू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com