Shruti Vilas Kadam
काही लोकांना डार्क सर्कल्सची समस्या आई-वडिलांकडून मिळू शकते. म्हणजेच आई किंवा वडिलांच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतील, तर मुलांनाही ही समस्या होऊ शकते. अशा वेळी पुरेशी झोप घेतली तरी डार्क सर्कल्स पूर्णपणे कमी होतीलच असे नाही.
दिवसभर पुरेसे पाणी न प्यायल्यास त्वचा कोरडी पडते. त्यामुळे चेहरा थकलेला आणि डोळ्यांखालील भाग काळा दिसू शकतो. म्हणून दिवसभर पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे.
अनेक तास मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही पाहिल्याने डोळ्यांवर ताण येतो. त्यामुळे डोळे थकलेले दिसतात आणि कोरडेही होऊ शकतात. म्हणून काम करताना मध्येच थोडा वेळ विश्रांती घ्या.
धूळ किंवा इतर कारणांमुळे डोळ्यांना खाज येऊ शकते. अशावेळी अनेकजण वारंवार डोळे चोळतात. त्यामुळे डोळ्यांभोवतीची त्वचा काळी पडू शकते. म्हणून डोळे चोळणे टाळा.
शरीरात लोह आणि काही जीवनसत्त्वांची कमतरता असल्यास डोळ्यांखाली डार्क सर्कल्स दिसू शकतात. विशेषतः लोहाची कमतरता असल्यास चेहरा फिकट दिसतो. त्यामुळे रोजच्या जेवणात हिरव्या भाज्या, फळे आणि पोषक पदार्थांचा समावेश करा.
सतत उन्हात फिरल्यामुळे त्वचेचा रंग काळवंडू शकतो. डोळ्यांखालील नाजूक त्वचेवरही याचा परिणाम होतो. त्यामुळे बाहेर जाताना सनस्क्रीन लावा आणि डोळ्यांच्या संरक्षणासाठी सनग्लासेस वापरा.
डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी रोज त्वचेची योग्य काळजी घ्या. पुरेसे पाणी प्या, ७ ते ८ तास झोप घ्या. तसेच डोळ्यांवर 10 मिनिटं बटाट्याचे काप लावा.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.