Hardik pandya statement after mi vs rr match cricket news in marathi  twitter
Sports

Hardik Pandya Statement: पराभवाची हॅट्ट्रिक झाल्यानंतर हार्दिक या खेळाडूंवर भडकला! पराभवाचं कारण सांगत म्हणाला...

MI vs RR, IPL 2024: मुंबई इंडियन्सला सलग तिसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या सामन्यातील पराभवानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने पराभवाचं कारण सांगितलं आहे.

Ankush Dhavre

Hardik Pandya Statement After MI vs RR Match, IPL 2024:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील १४ वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा मुंबई इंडियन्स संघाचा या हंगामातील होम ग्राऊंडवरील पहिलाच सामना होता. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना १२५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाने ६ गडी राखून सामना जिंकला. दरम्यान या सामन्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने पराभवाचं नेमकं कारण सांगितलं आहे.

मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने मान्य केलं की, लागोपाठ विकेट्स गेल्याने राजस्थान रॉयल्स संघाने सामन्यावरील पकड मजबूत केली. राजस्थान रॉयल्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी केवळ १२६ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाकडून युवा फलंदाज रियान परागने ३९ चेंडूत ५४ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. हा सामना राजस्थान रॉयल्सने ३३ चेंडू शिल्लक ठेऊन जिंकला. (Cricket news in marathi)

पराभवानंतर बोलताना काय म्हणाला हार्दिक पंड्या?

सामन्यानंतर बोलताना हार्दिक पंड्या म्हणाला की, ' आम्ही हवी तशी सुरुवात करू शकलो नाही. मला असं वाटलं की, आम्ही १५० किंवा १६० धावांपर्यंत पोहचू शकलो असतो. मात्र माझी विकेट पडली आणि सामना फिरला. त्यानंतर ते चांगल्या स्थितीत आले. मला वाटतं की, मी अजून चांगला खेळ करू शकलो असतो.'

तसेच तो पुढे म्हणाला की, ' एक संघ म्हणून आम्ही आणखी चांगला खेळ करू शकतो. मात्र त्यासाठी आम्हाला शिस्तबद्ध राहून धैर्याने खेळण्याची गरज आहे.' मुंबई इंडियन्स संघाला या हंगामात अजूनही सुर गवसलेला नाहीये. गेल्या तीनही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स मुंबई इंडियन्सला पराभूत केलं. त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद आणि आता राजस्थान रॉयल्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha : नगराध्यक्षांपाठोपाठ आता नगरसेवकांचेही ठरले; काहींचे गणित जमले तर काहींचे बिघडले

Maharashtra Live News Update: नागपुरात सकल ओबीसी समाजाचा उद्या महामोर्चा निघणार

दिवाळीच्या तोंडावर सोन्याला झळाळी; २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचा भाव किती? पहा लेटेस्ट दर

Ashok Mama : भैरवीच्या स्वप्नांना मिळणार अशोक मामांची खंबीर साथ; मालिका घेणार नवीन वळण, पाहा VIDEO

Shocking News : संतापजनक! खेळताना बॉल दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेला, संतापलेल्या सुरक्षारक्षकाकडून मुलांना बांधून मारहाण

SCROLL FOR NEXT