MI vs RR IPL Live 2024 twitter reacts after rohit sharma got out on golden duck cricket news in marathi
MI vs RR IPL Live 2024 twitter reacts after rohit sharma got out on golden duck cricket news in marathi twitter

MI vs RR, IPL 2024: 'झिरो चेक करुन घ्या सर..' रोहित शून्यावर बाद होताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Rohit Sharma Memes: रोहित गोल्डन डकवर बाद होताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे.

Twitter Reaction On Rohit Sharma Golden Duck:

मुंबई इंडियन्सचा तिसरा सामना राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध सुरु आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय राजस्थानच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला.

राजस्थानकडून गोलंदाजी करताना ट्रेन्ट बोल्टने मुंबई इंडियन्सला ३ मोठे धक्के दिले. दरम्यान रोहित शर्मा गोल्डन डकवर बाद होऊन माघारी परतला आहे. रोहित गोल्डन डकवर बाद होताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे.

वानखेडे स्टेडियमवर ट्रेन्ट बोल्टचा जलवा..

संजू सॅमसनने घेतलेला निर्णय राजस्थान रॉयल्स संघाने सार्थ ठरवला. राजस्थान रॉयल्स संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी ट्रेन्ट बोल्ट गोलंदाजीला आला. त्याने पहिल्याच षटकातील पाचव्या चेंडूवर रोहित शर्मावर संजू सॅमसनच्या हातून झेलबाद करत माघारी धाडलं. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने नमन धीरला शून्यावर बाद करत माघारी धाडलं. इम्पॅकट प्लेअर म्हणून फलंदाजी करण्यासाठी आलेला डेवाल्ड ब्रेविस देखील शून्यावर बाद होऊन माघारी परतला. (Cricket news in marathi)

MI vs RR IPL Live 2024 twitter reacts after rohit sharma got out on golden duck cricket news in marathi
MI vs RR ,IPL 2024: होम ग्राऊंडवर विजयाचा नारळ फुटणार? MI vs RR सामन्यात खेळपट्टी कोणाला देणार साथ? वाचा पीच रिपोर्ट

रोहित गोल्डन डकवर बाद होताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

रोहित शर्मा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात १७ व्या वेळेस शून्यावर बाद झाला आहे. या स्पर्धेत सर्वाधिक वेळेस शून्यावर बाद होण्याच्या बाबतीत त्याने दिनेश कार्तिकच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

मुंबई इंडियन्स- ईशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, जेराल्ड कोएट्ज़ी, पीयूष चावला, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाखा.

राजस्थान रॉयल्स - यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युजवेंद्र चहल.

MI vs RR IPL Live 2024 twitter reacts after rohit sharma got out on golden duck cricket news in marathi
SL vs BAN Test Series: IPL सुरू असताना श्रीलंकेचा मोठा कारनामा! भारताचा 'महारेकॉर्ड' मोडला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com