hardik pandya staatement on defeat after rajasthan royals vs mumbai indians match amd2000 twitter
Sports

Hardik Pandya Statement: मुंबईचा पराभव नेमका कोणामुळे झाला? हार्दिक पंड्याने स्पष्टच सांगितलं

RR vs MI, IPL 2024: राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या पराभवानंतर बोलताना काय म्हणाला हार्दिक पंड्या? जाणून घ्या.

Ankush Dhavre

राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला ९ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या मुंबई इंडियन्स संघाला २० षटकअखेर १७९ धावा करता आल्या. हे आव्हान राजस्थान रॉयल्स संघाने ९ गडी राखून पूर्ण केलं. यासह मुंबई इंडियन्स संघाला राजस्थान रॉयल्स संघाकडून सलग दुसऱ्यांदा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. दरम्यान पराभवानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने पराभवाचं नेमकं कारण सांगितलं आहे.

या पराभवानंतर बोलताना हार्दिक पंड्या म्हणाला की, ' एकापाठोपाठ एक विकेट्स गेल्यानंतर आम्ही १८० धावांचा विचार करत नव्हतो. त्यावेळी फलंदाजी करणं कठीण होतं. आमचे फलंदाज शेवटच्या षटकांमध्ये धावा करण्यात अपयशी ठरले. आम्ही १०-१५ कमी केल्या. त्यानंतर आमच्या गोलंदाजांनीही अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी केली नाही. पावरप्लेच्या षटकांमध्येही आम्ही धावा खर्च केल्या. त्यामुळे मला वाटतं की, आम्ही आज चांगली कामगिरी करू शकलेलो नाही. क्षेत्ररक्षणातही आमच्याकडुन चुका झाल्या. पराभव स्वीकारावा लागेलच.

तसेच तो पुढे म्हणाला की, ' मला वाटतं पराभवानंतर प्रत्येक खेळाडूला भेटून त्याच्याशी चर्चा करावी लागेल. कारण सर्व प्रोफेशनल खेळाडू आहेत. सर्वांना आपली भूमिका उत्तमरीत्या माहीत आहे. आमच्याकडुन काय चुका झाल्या आहेत. हे समजून आम्हाला त्यातून शिकावं लागेल. आम्ही कशात कमी पडतोय याचा शोध घेऊन आम्ही नक्कीच त्यावर काम करू.' मुंबई इंडियन्सच्या आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, या संघाने ८ सामने खेळले असून ३ सामने जिंकले आहेत. ६ गुणांसह हा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LIC AAO Recruitment: LIC मध्ये सरकारी नोकरीची संधी; पगार १६९००० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update: मुंबईत धो धो पाऊस, अंधेरी सब वे पाण्याखाली

Oldest Water on Earth: कॅनडातील शास्त्रज्ञांनी चाखलं २०० कोटी वर्षांपेक्षा जुनं पाणी; शास्तज्ञांकडून पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळाबद्दल मोठा खुलासा

Mumbai ganeshotsav: देशातील सर्वात श्रीमंत बाप्पा, 474 कोटींचा गणपती

Mumbai Rain: मुंबईकरांनो, घरातून बाहेर पडू नका! IMD कडून ३ तास धोक्याचा इशारा, त्यात वाहतूककोंडी अन् लोकलला लेट मार्क!

SCROLL FOR NEXT