Hardik Pandya Fined: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर हार्दिक पंड्यावर BCCI ची मोठी कारवाई

PBKS vs MI IPL 2024, Hardik Pandya Fined By BCCI: पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने शानदार विजय मिळवला. दरम्यान या विजयानंतर कर्णधार हार्दिक पंड्यावर बीसीसीआयने मोठी कारवाई केली आहे.
Hardik Pandya Fined: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर हार्दिक पंड्यावर BCCI ची मोठी कारवाई
Mumbai indians fined rupees 12 lakhs for slow over rate during pbks vs mi match amd2000twitter
Published On

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ३३ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. पंजाबच्या होम ग्राऊंडवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने शानदार कामगिरी केली आणि हा सामना ९ धावांनी जिंकला आहे. यासह मुंबई इंडियन्स संघाने ६ गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानी झेप घेतली आहे. दरम्यान या सामन्यानंतर मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्यावर बीसीसीआयकडून कारवाई करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबई इंडियन्स संघाने या सामन्यात पंजाब किंग्ज संघाला कडवी झुंज दिली. पराभव समोर दिसत असताना गेराल्ड कोएत्जीने आशुतोष शर्माला बाद केलं आणि मुंबई इंडियन्स संघाला या सामन्यात कमबॅक करुन दिलं. या सामन्यानंतर मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्स संघाला या सामन्यात ठरलेल्या वेळेत २० षटकं टाकता आलेली नाहीत. त्यामुळे बीसीसीआयकडून हार्दिक पंड्यावर १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Hardik Pandya Fined: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर हार्दिक पंड्यावर BCCI ची मोठी कारवाई
Hardik Pandya Statement: 'IPL मध्ये हे होतच..' पंजाबला धूळ चारल्यानंतर काय म्हणाला हार्दिक पंड्या?

पंजाब किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ निर्धारीत वेळेत २० षटकं पूर्ण करु शकला नाही. त्यामुळे शेवटच्या षटकात मुंबईला ५ ऐवजी केवळ ४ खेळाडू ३० यार्ड सर्कलच्या बाहेर उभे करता आले. हा सामना झाल्यानंतर हार्दिक पंड्यावर स्लो ओव्हर रेटच्या चुकीमुळे बीसीसीआयने १२ लाखांचा दंड ठोठावला आहे.

Hardik Pandya Fined: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर हार्दिक पंड्यावर BCCI ची मोठी कारवाई
IPL 2024: पर्पल कॅपच्या यादीत बुमराह नंबर १! ऑरेंज कॅपसाठी विराटला या फलंदाजांकडून कडवी झुंज

मुबंईचा शानदार विजय...

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर मुंबई इंडियन्सचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला. मुंबई इंडियन्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ७८ धावांची खेळी केली.

तर रोहित शर्माने ३६ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सने २० षटकअखेर ७ गडी बाद १९२ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्जकडून आशुतोष शर्माने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. मात्र तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. पंजाब किंग्ज संघाला हा सामना ९ धावांनी गमवावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com