hardik pandya yandex
Sports

Hardik Pandya Post: फिटनेसमुळे ट्रोल होणारा हार्दिक पंड्या कॅप्टन्सीसाठी तयार? स्वत: फोटो शेअर करत म्हणाला...

Hardik Pandya Instagram Post: भारतीय संघाचा कर्णधार कोण होणार? अशी चर्चा सुरु असताना हार्दिक पंड्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.

Ankush Dhavre

रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. त्यामुळे कर्णधारपदाची खुर्ची आता रिकामी झाली आहे. ही जागा घेण्यासाठी हार्दिक पंड्याला प्रबळ दावेदार मानलं जात होतं. टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघात रोहितची कर्णधार म्हणून तर हार्दिक पंड्याची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली होती. त्यामुळे रोहितने कर्णधारपद सोडताच हार्दिकच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. आता त्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.

फिटनेसवर टीका करणाऱ्यांना हार्दिकचं जोरदार प्रत्युत्तर

हार्दिक पंड्या पूर्णपणे फिट नाही, तो अनेकदा फिटनेसमुळे संघाबाहेर असतो, हार्दिकवर अशा अनेक टीका केल्या गेल्या. आता त्याने सर्वांना प्रत्युत्तर देणारी पोस्ट शेअर केली आहे. त्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर २ फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये तो अनफिट असल्याचं दिसून येत आहे. त्याचं पोट बाहेर आल्याचही दिसून येत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तो पूर्णपणे फिट असल्याचं दिसून येत आहे.

या फोटोला त्याने कॅप्शनही दिलं आहे. ज्यावर त्याने लिहिले की, 'वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील गंभीर दुखापतीनंतर कमबॅक करणं कठीण होतं. पण टी-२० वर्ल्डकपमध्ये मिळवलेल्या विजयानंतर माझ्या प्रयत्नांना यश आलं. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करता तोपर्यंत तुमच्या प्रयत्नांना यश येतं. तुमची मेहनत कधीच वाया जात नाही. '

कर्णधारपदासाठी चुरशीची लढत

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा रोहित शर्माची टी-२० संघाचा कर्णधार म्हणून शेवटची स्पर्धा ठरली. रोहितनंतर टी-२० संघाचा कर्णधार कोण होणार? अशी चर्चा सुरु आहे. या पदासाठी सुरुवातीला हार्दिक पंड्याचं नाव आघाडीवर होतं. मात्र आता सूर्यकुमार यादवचं नाव आघाडीवर आहे. फिटनेसमुळे हार्दिकला डावललं जात होतं. मात्र आता हार्दिकने आपण फिट असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे गौतम गंभीर आणि निवडकर्ते काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT