वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध कोलकाता हा सामना रंगत आहे. या सामन्यामध्ये मुंबईच्या गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळत आहेत. सुरुवातीपासूनच मुंबईने केकेआरवर दबाव टाकला आहे. या सामन्यादरम्यान हार्दिक पंड्याने केलेल्या एका सेलिब्रेशनची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. हार्दिकच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओदेखील व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
सुनील नारायण, क्वींटन डी कॉक, अजिंक्य रहाणे आणि व्यंकटेश अय्यर बाद झाल्यानंतर अंगकृष रघुवंशी आणि रिंकू सिंह फलंदाजी करत होते. तेव्हा सहाव्या ओव्हरमध्ये हार्दिक पंड्या गोलंदाजी करण्यासाठी आला. ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर रघुवंशीने शॉट मारला आणि तो कॅचआउट झाला. तेव्हा हार्दिक पंड्याने बाय-बाय सेलिब्रेशन केले. टी-२० वर्ल्डकपमध्ये ज्या वेळेस बाबर आझमची विकेट घेतली होती, त्यावेळेस त्याने बाय-बाय सेलिब्रेशन केले होते. त्यावेळेस हार्दिकच्या सेलिब्रेशनची चर्चा झाली होती.
वानखेडेत मुंबईच्या गोलंदाजांनी दमदार खेळ केला आहे. कोलकाता नाईट रायडर्सचे प्रमुख फलंदाज बाद होऊन मैदानाबाहेर गेले आहेत. सामन्यात मुंबईचे पारडे जड असल्याचे म्हटले जात आहे. सुरुवातीचे दोन्ही सामने गमावल्यानंतर मुंबईने आज वानखेडेमध्ये कमबॅक केल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११ -
रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार, विग्नेश पुथुर.
कोलकाता नाईट रायडर्सची प्लेईंग ११ -
सुनील नारायण, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंह, अंगकृष रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरूण चक्रवर्ती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.