
भारताचा फिरकीपटू मोहम्मद शमी मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. होळी खेळल्याने शमीला आणि त्याच्या मुलीला ट्रोल करण्यात आले होते. आता नव्या एका प्रकरणामुळे शमी चर्चेचा विषय बनला आहे. मोहम्मद शमीची पूर्वाश्रमीची पत्नी हसीन जहाँने शेअर केलेल्या एक पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. काय आहे प्रकरण? चला जाणून घेऊयात..
हसीन जहाँची पोस्ट ही मोहम्मद शमीची बहीण शबाना आणि मेहुणा मोहम्मद गझनबी यांच्याशी संबंधित आहे. मनरेगा वेतनाच्या फसवणुकीच्या एका प्रकरणामध्ये शमीची बहीण, तिचा नवरा यांच्यासह आणखी आठ जणांची नावे असल्याचे समोर आले आहे. या बातमीवर हसीन जहाँने पोस्ट शेअर केली आहे. तिने या पोस्टमध्ये वर्तमानपत्राचा फोटो लावला आहे.
"भष्ट्राचारी प्रधान देश आहे भारत, गरीबांना आणखी गरीब, आणखी पीडित बनवलं जात आहे आपल्या महान भारत देशात.. श्रीमंतांना सुविधा पुरवल्या जातात आणि बेकायदेशीर कामांना पाठिंबा दिला जातो. तसही शमी अहमदचा बाप बनला आहे नरेंद्र मोदी आणि योगी, सर्व बदनाश सहज सुटतील. तसंही अमरोहाचे पोलीस कोणत्याच कामाचे नाहीयेत. ते तक्रार करणाऱ्याला धमकावून प्रकरण मिटवून टाकतात. असो, बेकायदेशीर काम आणि गैरकृत्ये करणे हा शमी अहमदचा कौटुंबिक व्यवसाय आहे", असे कॅप्शन हसीन जहाँने पोस्टला दिले आहे.
काय आहे प्रकरण?
मोहम्मद शमीची बहीण शबिनाचे लग्न पलौला गावातील मोहम्मद गझनबीशी झाले होते. शबिनाची सासू त्या गावची प्रमुख आहे. शबिना आणि तिच्या नवऱ्याने गावामध्ये मनरेगा कामगार म्हणून स्वत:ची नोंदणी केली होती. त्यांनी मनरेगा कामगार असे जॉब कार्डदेखील तयार केली होती. त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये २.६६ लाख रुपये मनरेगा वेतन होते. शबिना, तिचा पती गझनबी, त्याचे दोन मेहुणे यांनी मनरेगा वेतनात फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.