Mahendra Singh Dhoni : धोनी १० ओव्हर्स पण खेळू शकत नाही, चेन्नईच्या प्रशिक्षकाचा मोठा खुलासा; कारण...

MS Dhoni CSK : चेन्नईच्या सामन्यांमध्ये लवकर फलंदाजीसाठी येत नाही यावरुन महेंद्रसिंह धोनीवर टीका केली जात आहे. माही फलंदाजीसाठी वरच्या ओव्हर्समध्ये फलंदाजी का करत नाही याचा खुलासा चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी केला आहे.
Mahendra Singh Dhoni
Mahendra Singh Dhoni x (twitter)
Published On

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेजर्स बंगळुरू या सामन्यामध्ये महेंद्रसिंह धोनी हा नवव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. यामुळे धोनीला ट्रोल करण्यात आले. कालच्या राजस्थान विरुद्धच्या सामन्यात धोनी सातव्या क्रमांकावर खेळायला आला. धोनी फलंदाजीसाठी उशिरा मैदानामध्ये उतरत असल्याने चाहते नाराज झाले आहे. दरम्यान माही मधल्या ओव्हर्समध्ये खेळायला का येत नाही याची माहिती समोर आली आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी एमएस धोनी खालच्या क्रमावर का खेळायला येतो याचा खुलासा केला. "सामन्याच्या परिस्थितीवरुन धोनी कोणत्या कधी खेळायला जायचे हे ठरवतो. त्याचे शरीर, त्याचे गुडघे आता पूर्वीसारखे काम करत नाहीत. तो व्यवस्थितपणे हालचाल करु शकतो पण त्याचे गुडघे पूर्णपणे ठिक नाहीयेत", असे स्टीफन फ्लेमिंग म्हणाले.

Mahendra Singh Dhoni
Kavya Maran SRH : हैदराबादचा पराभव अन् मालकिण बाई भडकल्या, काव्या मारनने घेतला मोठा निर्णय, नेमकं प्रकरण काय?

"एमएस धोनी हा चेन्नई संघासाठी एक महत्त्वपूर्ण भाग आहे. पण त्याला नियमितपणे दीर्घकाळ फलंदाजी करणे शक्य होत नाहीये. तो संघासाठी काय करु शकतो हे धोनी त्या-त्या दिवशी ठरवत असतो. जर खेळ संतुलित असेल, तर तो फलंदाजीसाठी लवकर मैदानात जाईल. तो अन्य खेळाडूंना संधी देत आहे. तो परिस्थिती पाहून खेळ ठरवत आहे", असे वक्तव्य देखील चेन्नईच्या प्रमुख प्रशिक्षकांनी केले.

Mahendra Singh Dhoni
Riyan Parag RR Vs CSK : रियान परागला 'ती' चूक नडली! सामना जिंकूनही BCCI ची मोठी कारवाई

"माहीला न खेळवण्याचा विचार आम्ही करत आहोत. मी गेल्या वर्षी म्हटले होते, तो संघासाठी महत्त्वाचा आहे. त्याचे नेतृत्त्व, त्याची विकेटकीपिंग चेन्नईसाठी महत्त्वाची आहे. तेव्हा त्याला ९-१० ओव्हर्समध्ये फलंदाजीसाठी मैदानात पाठवले जाणार नाही. तो १३-१४ ओव्हर्सनंतरच फलंदाजी करण्यासाठी जाईल", असे स्टीफन फ्लेमिंग यांनी माध्यमांना सांगितले आहे.

Mahendra Singh Dhoni
Hardik Pandya IPL 2025 : नाव न घेताच हार्दिकचा हिटमॅनवर निशाणा? पराभवाचं कारण सांगत म्हणाला...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com