
Fact Check : गुवाहाटीमध्ये काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना खेळला गेला. आयपीएल २०२५ च्या या सामन्यामध्ये राजस्थानने चेन्नईवर वर्चस्व मिळवत पहिला विजय मिळवला. पराभवानंतर सोशल मीडियावर महेंद्रसिंह धोनीला अनेकजण ट्रोल करायला लागले. त्याच दरम्यान सोनू निगमचे ट्वीट व्हायरल झाले.
चेन्नई विरुद्ध बंगळुरु या सामन्यात गरज असताना महेंद्रसिंह धोनी फलंदाजीसाठी मैदानात उतरला नाही. तो नवव्या ओव्हरमध्ये खेळायला आला. त्याआधी रविचंद्रन अश्विन फलंदाजीला आला. यावरुन धोनीला सर्वजण ट्रोल करायला लागले. त्यामुळे काल धोनी वरच्या क्रमावर फलंदाजीसाठी आला. पण तरीही चेन्नईने सामना गमावला.
चेन्नईच्या पराभवानंतर सोशल मीडियावर एक ट्वीट व्हायरल झाले. यात 'धोनी हा चेन्नई सुपर किंग्ससाठी पनवती बनत चालला आहे, त्याला काढून टाका' असे म्हटले होते. हे ट्वीट सोनू निगमने केल्याचे काहीजण म्हणत होते. गायक सोनू निगमने धोनीला उद्देशून हे ट्वीट केल्याचे समजले जात होते. पण हे ट्वीट फेक असून दुसऱ्याच सोनू निगमने केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. ट्वीट करणारी ही व्यक्ती सोनू निगम सिंह असून ते वकील असल्याचे समोर आले आहे.
चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी एमएस धोनीच्या खालच्या क्रमांकावर फलंदाजी करण्यामागचे कारण स्पष्ट केले. ते म्हणाले, "सामन्याच्या परिस्थितीवरुन धोनी कोणत्या कधी खेळायला जायचे हे ठरवतो. त्याचे शरीर, त्याचे गुडघे आता पूर्वीसारखे काम करत नाहीत. तो व्यवस्थितपणे हालचाल करु शकतो पण त्याचे गुडघे पूर्णपणे ठिक नाहीयेत."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.