स्वस्तात मस्त Mumbai जवळील ८ हिल स्टेशन्स; उन्हाळ्यात फिरण्यासाठी बेस्ट, सौंदर्य पाहताच माथेरान, महाबळेश्वरही विसराल

Shreya Maskar

उन्हाळी सहल

उन्हाळ्यात आपल्याला थंड हवेच्या ठिकाणी फिरायला खूप आवडते. नेहमी परदेशात फिरायला जाण्यापेक्षा आपल्या मुंबईजवळच सुंदर हिल स्टेशन्स लपली आहेत. ज्याला नक्की भेट द्या.

Summer Getaway | yandex

सूर्यमल

सूर्यमल हिल स्टेशन हे मुंबईजवळ पालघर जिल्ह्यात घनदाट जंगलांनी वेढलेले आहे. हे ठिकाण ट्रेकिंगसाठी उत्तम आहे. तुम्ही येथे मित्रांसोबत नक्की फिरायला जा.

Suryamal | google

जव्हार

जव्हार हिल स्टेशनला 'ठाणे जिल्ह्याचे महाबळेश्वर' म्हणतात. येथे हिरवळ, धबधबे पाहायला मिळतात. पालघर स्टेशनला उतरून तुम्हाला रिक्षाने येथे सहज जाता येते.

Jawhar | google

माळशेज घाट

माळशेज घाट हा महाराष्ट्र राज्यातील पुणे आणि ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवर, सह्याद्रीच्या पश्चिम घाटात स्थित एक प्रसिद्ध डोंगरी रस्ता आणि थंड हवेचे ठिकाण आहे. येथे तुम्ही रोड ट्रिपचा आनंद घेऊ शकता.

Malshej Ghat | google

मुळशी

पुणे जिल्ह्यातील मुळशी डॅम कॅम्पिंगसाठी खास लोकेशन आहे. जे निळसर पाणी, सह्याद्रीच्या रांगा आणि हिरवाईने वेढलेले आहे.

Mulshi | google

कर्जत

कर्जत हे मुंबईपासून जवळ असलेले एक उत्तम, शांत आणि कमी गर्दीचे निसर्गरम्य हिल स्टेशन आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे ठिकाण हिरवळ, धबधबे आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे.

Karjat | google

कोलाड

कोलाड हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात कुंडलिका नदीच्या काठावर वसलेले एक सुंदर आणि आकर्षक ठिकाण आहे.वॉटर राफ्टिंग हे येथील मुख्य आकर्षण आहे.

Kolad | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Hill Stations | yandex

NEXT : २०० हून अधिक लेणी एकाच ठिकाणी, 'हे' ऐतिहासिक पर्यटन स्थळ जपतेय प्राचीन वास्तुकलेचा वारसा

Pune Tourism | saam tv
येथे क्लिक करा...