Pune Tourism : २०० हून अधिक लेणी एकाच ठिकाणी, 'हे' ऐतिहासिक पर्यटन स्थळ जपतेय प्राचीन वास्तुकलेचा वारसा

Shreya Maskar

समर ट्रिप

उन्हाळ्यात पिकनिक प्लान करा. पुण्यातील जुन्नर येथे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर लेणी पाहायला मिळतील. लहान मुलांना वास्तुकलेचा एक अनोखा नजारा पाहायला मिळेल.

Summer | yandex

पुणे

जुन्नर लेणी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराच्या परिसरात, प्रामुख्याने शिवनेरी, मानमोडी, तुळजा लेणी आणि लेण्याद्री लेणी (गणेश मंदिर) यांसारख्या टेकड्यांवर वसलेल्या २०० हून अधिक प्राचीन बौद्ध शैलगृहांचा (दगडांत कोरलेल्या लेण्यांचा) एक विशाल समूह आहे.

Pune Tourism | google

जुन्नर लेणी

जुन्नर लेण्यांना भेट द्यायला गेल्यावर अप्रतिम बौद्ध स्थापत्यशैली, दरीचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. तुम्ही येथे सुंदर निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट करू शकता.

Junnar Caves | google

ट्रेकिंग

जुन्नर लेणी ही ट्रेकिंगसाठी देखील प्रसिद्ध आहे. तुम्ही येथे नक्कीच फॅमिली ट्रिप प्लान करू शकता. तुम्ही येथे उन्हाळ्यात पिकनिक प्लान करू शकता. लहान मुलांना येथील वास्तुकला दाखवण्यासाठी नक्की घेऊन जा.

Trekking | yandex

शिलालेख

जुन्नर येथील लेण्यांमध्ये ब्राह्मी लिपीतील अनेक शिलालेख आढळतात. हे शिलालेख प्रामुख्याने प्राकृत भाषेत असून त्यात सातवाहन काळातील दानशूर व्यक्ती, व्यापारी आणि बौद्ध भिक्खूंच्या दानांचा उल्लेख आहे. असे बोले जाते.

Junnar Caves | google

जुन्नर पर्यटन स्थळे

जुन्नर हे ऐतिहासिक आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ला, अष्टविनायकांपैकी दोन मंदिरे (लेण्याद्री व ओझर), प्राचीन नाणेघाट ही पर्यटन स्थळे आहेत.

Junnar Caves | google

कसे जायचे?

मुंबईहून जुन्नरला जाण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे ट्रेन प्रवास होय. तुम्ही मुंबईहून पुणे स्टेशनला उतरून बसेस किंवा खाजगी टॅक्सीने जुन्नरला जाऊ शकता.

Junnar Caves | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Junnar Caves | google

NEXT : रोड ट्रिपसाठी 'हे' आहे महाराष्ट्रातील सुंदर ठिकाण, कोल्हापूर ते कोकण प्रवास आयुष्यभर स्मरणात राहील

Kolhapur Tourism | yandex
येथे क्लिक करा...