Suraj Chavan: लग्नाच्या तीन महिन्यातच सुरज चव्हाणच्या घरी गुड न्यूज? संजनाच्या पोस्टमुळे रंगली चर्चा

Suraj Chavan: सूरज चव्हाणच्या पत्नीच्या सोशल मीडिया पोस्टमुळे प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण. लग्नानंतर अवघ्या 3 महिन्यांत ‘गुड न्यूज’ येणार का? जाणून घ्या काय आहे ही पोस्ट.
Suraj Chavan
Suraj ChavanSaam tv
Published On

Suraj Chavan: बिग बॉस मराठी ५’चा विजेता सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या कामामुळे नव्हे, तर वैयक्तिक आयुष्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे. तीन महिन्यापूर्वीच धुमधडाक्यात सुरजचं लग्न झालं होत. आता लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच सूरज चव्हाणच्या घरी ‘गुड न्यूज’ येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यामागे कारण ठरली आहे त्याची पत्नी संजना हिची एक सोशल मीडिया पोस्ट.

अलीकडेच गुढीपाडव्याच्या निमित्ताने संजनाने एक खास फोटोशूट केले आणि त्यातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या पोस्टसोबत लावलेल्या ऑडिओ क्लिपमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्या ऑडिओमध्ये आई होण्याच्या भावना व्यक्त करण्यात येत होत्या. हा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तर्क लावायला सुरुवात केली.

Suraj Chavan
Dhurandhar 2: पहिल्याच दिवशी २०० कोटी तर एका आठवड्यात ५०० कोटी; रणवीर सिंगचा 'धुरंधर २' करणार नवा रेकॉर्ड

याच पोस्टमध्ये संजनाचा निळी साडी नेसलेला हातात औकषणाचे ताट घेतलेला फोटो आहे. तसेच त्याच्यासोबत 'अजून तू माझ्या पोटात आहेस, पण मी तुझ्या प्रत्येक हालचालीला ओळखते. तू हललास की वाटतं आयुष्य हलकं झालं. आता फक्त तुझी वाट बघते. तुझ्या त्या पहिल्या श्वासासाठी, आणि त्या छोट्याशा हसण्यासाठी. माझं संपूर्ण जग तुझ्यात बसलेलं आहे.' हा सुंदर असा ऑडिओ क्लिप लावला आहे.

Suraj Chavan
Super Duperr Movie: एक फ्लॅट, दोन कुटुंब...; निर्मिती सांवत आणि च्या 'सुपर डुपर'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

याच पोस्टनंतर सोशल मीडियावर संजना प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आला आहे. अनेक चाहत्यांनी पोस्टखाली अभिनंदनाच्या कमेंट्स करत शुभेच्छांचा वर्षाव केला. काहींनी तर फोटोमध्ये बेबी बंप दिसत असल्याचाही दावा केला आहे. सूरज आणि संजना यांचे लग्न काही महिन्यांपूर्वीच पार पडले होते. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. लग्नानंतर दोघेही त्यांच्या नव्या आयुष्यात रमलेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com