MI Vs KKR Live Update : 2 धावा अन् 2 विकेट...! मुंबईच्या गोलंदाजांचा घरच्या मैदानावर दबदबा

MI Vs KKR Live Update News : मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी कमाल केली. सुरुवातीच्या दोन ओव्हर्समध्ये मुंबईच्या गोलंदाजांनी केकेआरच्या सलामीवीरांना माघारी पाठवले.
MI Vs KKR Live Update
MI Vs KKR Live Updatex (twitter)
Published On

वानखेडेवर मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना खेळला जात आहे. सामन्याच्या सुरुवातीलाच मुंबईच्या गोलंदाजांनी कोलकाताच्या दोन्ही सलामीवीरांना बाद करुन माघारी पाठवले आहे. पहिल्या ओव्हरमध्ये ट्रेंट बोल्ड आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये क्विंटन डी कॉकची विकेट पडली. तेव्हा स्कोअरबोर्डवर 2-2 असे पाहायला मिळाले होते.

ट्रेंट बोल्ड हा पहिली ओव्हर टाकण्यासाठी आला. ओव्हरच्या चौथ्या बॉलवर सुनील नारायण बोल्ड झाला. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी दीपक चहर आला. दीपक चहरच्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर क्विंटन डी कॉकने शॉट मारला आणि डब्यू करणाऱ्या अश्वनी कुमारने कॅच पकडली. तोपर्यंत केकेआरने फक्त २ धावा केल्या होत्या. अशा प्रकारे दोन ओव्हर्समध्ये दोन धावा असताना दोन विकेट पडल्या.

MI Vs KKR Live Update
Mahendra Singh Dhoni : धोनी १० ओव्हर्स पण खेळू शकत नाही, चेन्नईच्या प्रशिक्षकाचा मोठा खुलासा; कारण...

आयपीएल २०२५ मधील मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स ही लढत सुरु झाली आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. मुंबई इंडियन्स कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. घरच्या स्टेडियममध्ये खेळत असल्याने मुंबईला फॅन्सचा पाठिंबा मिळत आहे.

MI Vs KKR Live Update
MS Dhoni : चेन्नईसाठी धोनी पनवती बनलाय, सोनू निगमचे ट्वीट व्हायरल, काय आहे सत्य? वाचा

मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११ -

रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार, विग्नेश पुथुर

कोलकाता नाईट रायडर्सची प्लेईंग ११ -

सुनील नारायण, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंह, अंकृष रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरूण चक्रवर्ती.

MI Vs KKR Live Update
Mohammed Shami : शमी का बाप बना हुआ है नरेंद्र मोदी, हसीन जहाँच्या पोस्टमुळे नवा वाद पेटला? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com