4-लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिनची ताकद, 4.1 सेकंदात 100 km/h वेग...; Audi SQ8 ची भारतात दमदार एंट्री, वाचा वैशिष्ट्ये

AudiSQ8 Price:ऑडी SQ8 भारतात लॉन्च झाली असून 4-लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिन, 4.1 सेकंदात 100 km/h वेग, लक्झरी फीचर्स आणि दमदार परफॉर्मन्समुळे ही SUV ग्राहकांसाठी खास ठरणार आहे.
AudiSQ8 Price
New Audi SQ8 India Launchgoogle
Published On

मुंबई, १८ मार्च २०२६: ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने आज भारतात नवीन ऑडी एसक्‍यू८ लाँच केली, ज्‍यासह संतुलित कार्यक्षमता आणि अचूक अभियांत्रिकीमध्‍ये वाढ केली आहे. ऑडी एसक्‍यू८ ने ऑडी क्‍यू८ लाइन-अपमध्‍ये स्‍थान मिळवले आहे, जेथे या वेईकलच्‍या सिंगल, अत्‍यंत वैविध्‍यपूर्ण पॅकेजमध्‍ये लक्षवेधक उपस्थिती, उत्‍साहवर्धक कार्यक्षमता आणि दैनंदिन व्‍यावहारिकता आहे.

ऑडी एसक्‍यू८ भारतात १,७७,७२,००० रूपये (एक्स-शोरूम) या प्रारंभिक किमतीत उपलब्‍ध आहे. ही कार १० वर्षांचे कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी रोडसाइड असिस्‍टण्‍स, तसेच आकर्षक सर्वसमावेशक देखभाल व सर्विस पॅकेजेससह येते.

ऑडी इंडियाचे ब्रँड डायरेक्‍टर श्री. बलबीर सिंग धिल्‍लों म्‍हणाले, “ऑडी एसक्‍यू८ ने शक्‍ती, दैनंदिन उपयुक्‍तता आणि अस्‍सल व लक्षवेधक कार्यक्षमतेचे संतुलन देत भारतात आमच्‍या उच्‍च-कार्यक्षम एसयूव्‍ही लाइन-अपला दृढ केले आहे. ही एसयूव्‍ही आठवड्यादरम्‍यान आरामदायी ड्रायव्हिंग आणि वीकेण्‍डला उत्‍साहवर्धक प्रवासाचा आनंद देणाऱ्या वैविध्‍यपूर्ण लक्‍झरी एसयूव्‍हीचा शोध घेत असलेल्‍या ग्राहकांसाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. आम्‍हाला भारतभरात विशेषत: आमच्‍या सूक्ष्‍मदर्शी, तरूण ग्राहकांमध्‍ये परफॉर्मन्‍स कारसाठी वाढती मागणी दिसून येत आहे आणि ऑडी एसक्‍यू८ भारतातील बाजारपेठेत ब्रँडचा सर्वोत्तम परफॉर्मन्‍स वारसा आणण्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेचे स्‍वाभाविक विस्‍तारीकरण आहे.''

AudiSQ8 Price
Gudi Padwa 2026 Wishes: गुढीपाडवा आला! प्रियजनांना पाठवा हे खास मेसेज; मराठी, हिंदी, इंग्रजी WhatsApp स्टेटस वाचा एका क्लिकवर

या एसयूव्हीमध्ये ४.०-लिटर व्ही८ टीएफएसआय इंजिन असून ते ३७३ केडब्ल्यू शक्ती आणि ७७० एनएम टॉर्क निर्माण करते, ज्यामुळे ही कार केवळ ४.१ सेकंदांत ० ते १०० किमी/तास वेग गाठते आणि तिचा कमाल वेग २५० किमी/तास (इलेक्ट्रॉनिक मर्यादित) आहे. क्वॉट्रो परमनंट ऑल-व्हील ड्राइव्हसह सेल्फ-लॉकिंग सेंटर डिफरेंशियल, अॅडप्टिव्ह एअर सस्पेन्शन स्पोर्ट आणि कंटिन्युअस अॅडप्टिव्ह डॅम्पिंग सिस्टीम यामुळे उत्कृष्ट स्थिरता आणि नियंत्रण मिळते, तर ऑल-व्हील स्टीयरिंगमुळे गतीशीलता आणखी सुधारते. याशिवाय, एस-विशिष्ट स्पोर्ट एक्झॉस्ट सिस्टीम खास साउंड प्रोफाइल देते आणि पर्यायी प्रगत सस्पेन्शन पॅकेजमध्ये अॅक्टिव्ह रोल स्टेबलायझेशन व स्पोर्ट डिफरेंशियलचा समावेश आहे.

एक्स्टेरिअरच्या बाबतीत, एचडी मॅट्रिक्स एलईडी हेडलाइट्ससह ऑडी लेझर लाइट आणि विविध लाइट सिग्नेचर्समुळे उत्कृष्ट दृश्यता मिळते. २२-इंचांचे आकर्षक अलॉय व्हील्स, पर्यायी सिरॅमिक ब्रेक्स, एस-विशिष्ट बंपर्स, प्रकाशित डोअर सिल ट्रिम्स आणि लाल रंगातील ब्रेक कॅलिपर्स यामुळे कारचा स्पोर्टी लुक अधिक उठावदार दिसतो. अॅल्युमिनियम लुकमधील सिंगलफ्रेम ग्रिल आणि २डी ऑडी लोगो आधुनिकता दर्शवतात, तर फ्रेमलेस डोअर्स आणि पॅनोरॅमिक सनरूफ यामुळे कूपेसारखी प्रीमियम अपील मिळते. कार्बन स्टाइल आणि ब्लॅक स्टाइलिंग पॅकेजेसही पर्याय म्हणून उपलब्ध आहेत.

इंटीरिअर आणि इन्फोटेनमेंटमध्ये पुढील बाजूस एस एम्बॉसिंग असलेल्या स्पोर्ट सीट्स आणि मायक्रोफायबर/लेदर कॉम्बिनेशन अपहोल्स्ट्री दिली आहे, तर पर्यायी व्हॅलकोना लेदर सीट्समध्ये हीटिंग, व्हेंटिलेशन आणि मसाज फंक्शन उपलब्ध आहे. ऑडी व्हर्च्युअल कॉकपिट प्लस, एमएमआय नेव्हिगेशन प्लस आणि टच रिस्पॉन्स सिस्टममुळे ड्रायव्हिंग अनुभव अधिक स्मार्ट होतो. १७ स्पीकर्स, ७३०-वॅट आउटपुट आणि १६-चॅनेल अॅम्प्लिफायरसह बँग अँड ऑलुफसेन थ्रीडी प्रीमियम साउंड सिस्टम उत्कृष्ट ऑडिओ अनुभव देते. फ्लॅट-बॉटम स्पोर्ट स्टीयरिंग, ३० रंगांच्या पर्यायांसह अॅम्बियंट लाइटिंग आणि मॅट ब्रश्ड अॅल्युमिनियम इनले केबिनला अधिक प्रीमियम बनवतात.

आरामदायीपणा आणि सोयीसुविधांच्या दृष्टीने, ४-झोन डिलक्स ऑटोमॅटिक एअर कंडिशनिंग (आयोनायझर व फ्रेग्रन्स फंक्शनसह), ३६०-डिग्री कॅमेऱ्यांसह पार्क असिस्ट प्लस, सॉफ्ट डोअर क्लोज, इलेक्ट्रिक लगेज कंपार्टमेंट लिड आणि वायरलेस चार्जिंगसह ऑडी फोन बॉक्स लाइट यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. याशिवाय, इंटीग्रेटेड वॉशर जेट्ससह अॅडप्टिव्ह विंडशील्ड वायपर्सही उपलब्ध आहेत.

रंगांच्या बाबतीत, मिथोस ब्लॅक, डेटोना ग्रे, ग्लेशियर व्हाइट, अस्कारी ब्लू, चिली रेड, सखीर गोल्ड, सॅटेलाइट सिल्व्हर आणि वैटोमो ब्लू असे आकर्षक एक्स्टेरिअर रंग उपलब्ध आहेत, तर इंटीरिअरमध्ये लिनिअर एम्बॉसिंग सिल्व्हर, ओक ग्रे आणि ब्रश्ड अॅल्युमिनियम इनले पर्याय दिले आहेत. तसेच, ऑडी एक्सक्लूसिव्ह कस्टम रंगही पर्याय म्हणून उपलब्ध आहेत.

सुरक्षितता आणि ड्रायव्हर सहाय्यासाठी, या एसयूव्हीमध्ये आठ एअरबॅग्स, स्पीड लिमिटरसह क्रूझ कंट्रोल आणि ऑडी प्री सेन्स बेसिक यांचा समावेश आहे. अधिक चांगल्या दृश्यतेसाठी नाइट व्हिजन असिस्ट आणि हेड-अप डिस्प्ले (पर्यायी) उपलब्ध असून, लेन डिपार्चर वॉर्निंग सिस्टममुळे ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह बनते.

AudiSQ8 Price
PAN Card Update : केवळ आधार कार्ड वापरून पॅन कार्ड बनवता येणार नाही; 'या' कागदपत्रांचीही गरज लागणार; पण कधीपासून?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com