harbhajan singh shows interest in coaching team india says reports cricket news in marathi  saam tv news
Sports

Team India Head Coach: 'बॅट्समनला खेळायचं कसं, शिकवावं लागत नाही..' हरभजन सिंगला व्हायचंय टीम इंडियाचा हेड कोच

Harbhajan Singh Team India Head Coach: भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगनेही भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप खेळण्यासाठी वेस्टइंडीजला रवाना होणार आहे. ही स्पर्धा राहुल द्रविड यांच्यासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून शेवटची स्पर्धा असणार आहे. बीसीसीआयने नव्या मुख्य प्रशिक्षकाचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. यात स्टीफन फ्लेमिंगचं नाव आघाडीवर आहे. दरम्यान भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगनेही भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा झाल्यानंतर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. नव्या मुख्य प्रशिक्षकासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत. माध्यमातील वृत्तानुसार, पुढील प्रशिक्षक परदेशी खेळाडू असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ज्यात स्टीफन फ्लेमिंग, रिकी पाँटिंग आणि जस्टीन लँगर यांची नावं आघाडीवर आहे. मात्र या तिघांनीही अजूनपर्यंत होकार दिलेला नाही.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार हरभजन सिंग मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्विकारण्यासाठी तयार आहे. त्याने एएनआयशी चर्चा करताना म्हटले की, ' मी अर्ज करेल की नाही माहित नाही. भारतीय संघाला प्रशिक्षण देणं हे मॅन मॅनेजमेंटचं काम आहे. त्यांना कव्हर ड्राइव्ह आणि पुल शॉट कसा मारायचा हे शिकवावं लागत नाही.तर खेळाडूंना फक्त मॅनेज करावं लागतं. गोलंदाजांना गोलंदाजी कशी करावी हे शिकवावं लागत नाही. फक्त थोडसं मार्गदर्शन करावं लागतं. मला जर संधी मिळाली, तर नक्कीच मला ही जबाबदारी पार पाडायला आवडेल. क्रिकेटने मला खुप काही दिलं आहे. आता क्रिकेटला काहीतरी देण्याची वेळ आली आहे, तर मी नक्कीच ते करेल.'

हरभजन सिंग हा भारतीय संघातील अनुभवी फिरकी गोलंदाज आहे. तो टी-२० वर्ल्डकप आणि वनडे वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग राहिला आहे. हरभजन सिंगपूर्वी ही जबाबदारी गौतम गंभीरकडे सोपवणार असल्यीची जोरदार चर्चा सुरु होती. मात्र गंभीरकडून कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

Government Employee Pension : सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर! आता २० वर्षाच्या सेवेवर मिळणार पेन्शन

SCROLL FOR NEXT