T20 World Cup 2024: जय शहांची मोठी भविष्यवाणी! म्हणाले, टीम इंडियासह हे ३ संघ गाठणार सेमीफायनल

Jay Shah T20 World Cup 2024 Semi Final Prediction: बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी देखील टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ जाणार याबाबत भाष्य केलं आहे
T20 World Cup 2024: जय शहांची मोठी भविष्यवाणी! म्हणाले, टीम इंडियासह हे ३ संघ गाठणार सेमीफायनल
bcci secretary jay shah predicts the top 4 semi finalist in icc t20 world cup 2024 amd2000google
Published On

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ही स्पर्धा सुरु होण्याआधी दिग्गज क्रिकेटपटूंनी विजेत्या संघाबाबत आणि सेमीफायनलमध्ये कोणते संघ जाणार याबाबत भविष्यवाणी करायला सुरुवात केली आहे.

आता बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी देखील टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ जाणार याबाबत भाष्य केलं आहे. आपल्या आवडत्या संघांमध्ये त्यांनी गेल्या हंगामातील विजेता आणि उपविजेता इंग्लंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचं नाव घेतलेलं नाही. कोणते आहेत ते ४ संघ? जाणून घ्या.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान जय शहा यांना कोणते ४ संघ सेमीफायनलमध्ये जाऊ शकतात? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि वेस्टइंडीज या ४ संघांची नावं घेतली आहे. यादरम्यान त्यांनी इंग्लंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचं नाव घेतलेलं नाही. या दोन्ही संघांनी गेल्या हंगामात फायनलमध्ये प्रवेश केला होता.

T20 World Cup 2024: जय शहांची मोठी भविष्यवाणी! म्हणाले, टीम इंडियासह हे ३ संघ गाठणार सेमीफायनल
IPL 2024 Playoff Prediction: ४ संघ ५ सामने! RCB की CSK? कोण जाणार प्लेऑफमध्ये?

भारतीय संघाच्या सध्याच्या फॉर्मबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना जय शहा म्हणाले की, ' भारतीय संघात फॉर्म आणि अनुभव यांचं चांगलं कॉम्बिनेशन आहे. निवडकर्ते केवळ आयपीएल स्पर्धेतील कामगिरीच्या बळावर संघाची निवड करु शकत नाही. कारण परदेशात खेळण्याचा अनुभवही असायला हवा.'

T20 World Cup 2024: जय शहांची मोठी भविष्यवाणी! म्हणाले, टीम इंडियासह हे ३ संघ गाठणार सेमीफायनल
IPL 2024 Playoffs Prediction: लिहून घ्या! हेच ४ संघ करणार IPL 2024 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश

या मुलाखतीदरम्यान त्यांना आवडत्या भारतीय क्रिकेटपटूंबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि सुनील गावसकर यांचं नाव घेतलं. तर वर्तमान संघाचत विराट कोहली, रोहित शर्मा,जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या हे त्यांचे आवडते खेळाडू असल्याचं त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com