IPL Playoffs, Qualifier 1: पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोणाला मिळणार फायनलचं तिकीट?

KKR vs SRH, IPL Playoffs: क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.
IPL Playoffs, Qualifier 1: पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोणाला मिळणार फायनलचं तिकीट?
what if kkr vs srh match washedout or cancelled who will qualify in final know scenario amd2000saam tv

आयपीएल २०२४ स्पर्धेतील साखळी फेरीतील ७० सामने पूर्ण झाले आहेत. आजपासून या स्पर्धेतील प्लेऑफच्या सामन्यांना प्रारंभ होणार आहे. क्वालिफायर १ च्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सामना दुसऱ्या स्थानी असलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघासोबत होणार आहे. हा सामना संध्याकाळी ७:३० वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. दरम्यान या सामन्यातही पाऊस पडला आणि सामना रद्द झाला, तर काय होणार? जाणून घ्या.

सामना रद्द झाल्यास काय होणार?

गतवर्षी झालेल्या आयपीएल फायनलगदरम्यान पाऊस पडला होता. राखीव दिवस असल्याने हा सामना दुसऱ्या दिवशी खेळवण्यात आला होता. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने बाजी मारत जेतेपदावर नाव कोरलं होतं. प्लेऑफच्या सामन्यांसाठी राखीव दिवस नसणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत त्याच दिवशी निकाल लावण्याचा प्रयत्न केला जाईल.

जर या सामन्यात पावसाने हजेरी लावली, तर कमीत कमी ५-५ षटकांचा सामना खेळवण्याचा प्रयत्न केला जाईल. दरम्यान ५-५ षटकांचा सामनाही होऊ शकला नाही, तर १-१ षटकांचा सामना खेळवला जाईल. मात्र जर सामना रद्द केला गेला, तर गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला कोलकाता नाईट रायडर्सचा संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल.

IPL Playoffs, Qualifier 1: पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोणाला मिळणार फायनलचं तिकीट?
KKR vs SRH,IPL Playoff: केकेआर नव्हे तर हैदराबादलाच मिळणार फायनलचं तिकीट! चक्रावून टाकणारी आकडेवारी एकदा पाहाच

या स्पर्धेसाठी असे आहेत दोन्ही संघ:

सनरायझर्स हैदराबाद-

ट्रैविस हेड, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टिरक्षक), अब्दुल समद, शाहबाज़ अहमद, सनवीर सिंग, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, विजयकांत व्यासकांत, टी नटराजन, अभिषेक शर्मा, उमरान मलिक, मयंक अगरवाल, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जानसेन, मयंक मारकंडे, एडेन मार्कराम, राहुल त्रिपाठी, अनमोलप्रीत सिंग, उपेंद्र यादव, झटवेध सुब्रमण्यन, फजलहक फारूकी, आकाश महाराज सिंग.

IPL Playoffs, Qualifier 1: पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोणाला मिळणार फायनलचं तिकीट?
IPL 2024 Final: चेन्नईत रंगणार फायनलचा थरार! तिकीट कसं बुक करायचं अन् सर्वात स्वस्त तिकिटाची किंमत किती?

कोलकाता नाईट रायडर्स

रहमानुल्लाह गुरबाज (यष्टिरक्षक), सुनील नारायण, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, नितीश राणा, आंद्रे रसेल, रमनदीप सिंग, मिशेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोड़ा, अनुकूल रॉय, सुयश शर्मा, अंगकृष रघुवंशी, मनीष पांडे, दुष्मंथा चमीरा, श्रीकर भरत, चेतन सकारिया, शेरफेन रदरफोर्ड, साकिब हुसेन, अल्लाह गजनफर.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com