Anushka Sharma आणि Athiya Shetty बद्दल असं काय बोलून गेला Harbhajan Singh?, नेटिझन्सनी केली माफी मागण्याची मागणी

Harbhajan Singh Commentary Video: या सामन्यादरम्यान टीम इंडियाचा माजी क्रिकेटर हरभजन सिंग एका कॉमेंट्रीमुळे अडचणीत आला आहे.
Harbhajan Singh Commentary Video
Harbhajan Singh Commentary VideoSaam Tv

Harbhajan Singh Trolled:

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी वर्ल्डकप २०२३चा (World Cup 2023) अंतिम सामना टीम इंडिया विरूद्ध टीम ऑस्ट्रेलियामध्ये (Team India Vs Team Australia) पार पडला. या सामन्यामध्ये टीम ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव करत सहाव्यांदा वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं. रविवारचा दिवस फक्त टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी नाही तर संपूर्ण भारतीयांसाठी खूपच निराशजनक ठरला.

टीम इंडियाचा पराभव झाल्यामुळे अनेकांची निराशा झाली आणि सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी नाराजी व्यक्त केली. या सामन्यातील व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशामध्ये या सामन्यादरम्यान टीम इंडियाचा माजी क्रिकेटर हरभजन सिंग (Harbhajan Singh) अडचणीत आला आहे.

रविवारी झालेल्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताच्या पराभवापेक्षा हरभजन सिंगच्या कमेंटमुळे अनेकांना जास्त दुःख झाले. या सामन्यादरम्यान कॉमेंट्री करत असताना हरभजन सिंग हा अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टीबद्दल जे काही बोलला ते नेटिझन्सला अजिबात आवडले नाही. सध्या सोशल मीडियावर हरभजन सिंगला ट्रोल केले जात आहे. त्याचसोबत त्यांनी क्रिकेटरला माफी मागण्याची मागणी केली आहे.

वर्ल्ड कप २०२३ च्या फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना टीम ऑस्ट्रेलियासोबत झाला. हा सामना पाहण्यासाठी फक्त सामान्य जनताच नाही तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह बॉलिवूडच्या स्टार्सनी हजेरी लावली होती. टीम इंडियाने पहिली बॅटिंग तर ऑस्ट्रेलियाने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. हा सामना पाहण्यासाठी आणि आपल्या नवऱ्याला सपोर्ट करण्यासाठी क्रिकेटपटू विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आणि केएल राहुलची पत्नी आथिया शेट्टीने हजेरी लावली होती.

या सामन्याची कॉमेंट्री टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने केली. कॉमेंट्री करत असताना हरभजन सिंगने अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टीवर कमेंट्स केली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हरभजन सिंगला ट्रोल केले जात असून त्याच्यावर जोरदार टीका केली जात आहे. तसंच त्याने तात्काळ दोघींचीही माफी मागावी अशी मागणी केली जात आहे.

Harbhajan Singh Commentary Video
Maharashtrachi Hasyajatra: हास्यजत्रेत निर्मिती सावंत करणार ‘फुल्ल टू एंटरटेन’; कलाकारांसोबत सादर करणार भन्नाट स्किट, पाहा प्रोमो…

कॉमेंट्री करताना हरभजन सिंग म्हणाला की, 'मला वाटतंय की चर्चा क्रिकेटवर व्हायला हवी. आणि मी विचार करत होतो की आपण क्रिकेटबद्दल बोलत आहोत की चित्रपटांबद्दल. कारण मला माहित नाही की क्रिकेटबद्दल किती समजत असेल.' हरभजनने ही कॉमेंट तेव्हा केली जेव्हा केएल राहुल आणि विराट कोहली एकत्र मैदानात बॅटिंग करत होते. हे दोघेही भारतासाठी वर्ल्डकप जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होते. हरभजन जेव्हा ही कॉमेंट्री करत होता तेव्हा स्क्रिनवर अनुष्का शर्मा आणि आथिया शेट्टी दिसत होत्या.

Harbhajan Singh Commentary Video
Ranveer Singh Video: रणवीर-दीपिकाला भेटायला आली 'किंग खान'ची मुलं, व्हिडीओची होतेय चर्चा

हरभजन सिंगच्या या वक्तव्यानंतर त्याला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. हरभजचा व्हिडीओ शेअर करताना एका चाहत्याने, 'हरभजन सिंग महिलांना क्रिकेट समजत नाही हे तुम्हाला म्हणायचे आहे? कृपया लगेच माफी मागावी.' असे लिहिले आहे. तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'हिंदी कमेंटेटर अनुष्का शर्माच्या क्रिकेटबद्दलच्या समजूतीवर उघडपणे खिल्ली उडवत आहे. भाऊ आपण कधी सुधरणार, ती फक्त अनुष्का नाही, ती विराट कोहलीची पत्नी आहे. ज्याने नुकताच इतिहास रचला आहे आणि एवढ्या लोकांच्या नजरेतून एखाद्याची खिल्ली उडवणे हे अगदीच हास्यास्पद आहे. माफी मागावी.' अशापद्धतीने कमेंट्स करत नेटिझन्स हरभजन सिंगची शाळा घेत आहेत.

Harbhajan Singh Commentary Video
Shakira Tax Fraud: पॉप सिंगर शकीराला होऊ शकते ८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, काय आहे प्रकरण?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com