
नेहमीच आपल्या कॉमेडीचा अचुक टायमिंग साधत प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अव्वल आहे. कायमच हा शो चाहत्यांचे निखळ मनोरंजन करतो. अनेकदा चित्रपटाची टीम सुद्धा या शोमध्ये आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी हजेरी लावत असतात. नुकतंच ‘झिम्मा २’च्या टीमने शोमध्ये प्रमोशनसाठी हजेरी लावली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नुकतंच समीर चौघुलेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर आगामी एपिसोडचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये, आपल्या फ्री स्टाईलने चाहत्यांना हसवणाऱ्या निर्मिती सावंत येणार असल्याचे दिसत आहे. त्यांच्या एन्ट्रीमुळे येत्या एपिसोडमध्ये चाहत्यांना फुल्ल टू एन्टरटेन होणार आहे. आधीच्या एपिसोडमध्ये ओंकार भोजने दिसला होता. त्याने फक्त एक दिवसासाठी कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. त्याच्या एन्ट्रीने शोमध्येच चांगलाच हशा पिकला होता.
समीर चौघुलेने शोचा प्रोमो शेअर करताना, ‘हास्यजत्रेच्या मंचावर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत यांची धमाल!’ अशा आशयाचे कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या स्किटमध्ये, प्रसाद खांडेकर, प्रियदर्शनी इंदलकर, नम्रता संभेराव, प्रथमेश दिसत आहे. निर्मिती सावंत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मध्ये येणार म्हटल्यावर त्यांच्या एन्ट्रीबद्दल प्रेक्षक उत्सुक आहेत. आजच्या एपिसोडमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’या कॉमेडी शोमध्ये ‘झिम्मा २’ची टीम हजेरी लावणार आहे. (Social Media)
कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने, जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मीत सोबतच हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’मध्ये मुख्य भूमिकेत, सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर अशी दमदार स्टारकास्ट दिसत आहे. चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. (Entertainment News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.