Javed Akhtar Reveals Dunki Climax: जावेद अख्तर यांनी ‘डंकी’चा क्लायमॅक्संच सांगितला, म्हणाले...

Dunki Climax: गीतकार आणि शायर जावेद अख्तर यांनी शाहरुख खानच्या ‘डंकी’च्या क्लायमॅक्सवर भाष्य केलं आहे.
Javed Akhtar Reveals Dunki Climax
Javed Akhtar Reveals Dunki ClimaxSaam Tv

Javed Akhtar Reveals Dunki Climax

राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’चा किंग खानच्या वाढदिवशी टीझर रिलीज झाला. टीझरनंतर चित्रपटाचा पोस्टरही रिलीज झाला. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांनाच या चित्रपटाबद्दल बरीच उत्सुकता निर्माण झाली. नुकतंच गीतकार आणि शायर जावेद अख्तर यांनी चित्रपटाच्या क्लायमॅक्सवर भाष्य केलं आहे. मुलाखतीतून त्यांनी चाहत्यांना चित्रपटाचा क्लायमॅक्स सांगितला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Javed Akhtar Reveals Dunki Climax
Salman Khan On Tiger 4: खरंच सलमान खानचा 'टायगर 4' येतोय का?, वर्ल्डकप फायनलमध्ये स्वत: अभिनेत्याने दिली हिंट

न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये जावेद अख्तर यांनी सांगितले की, “चित्रपटासाठी मी एकच गाणे लिहिले आहे. ते शेवटचं गाणं असून त्याच गाण्यावरुन हा चित्रपट संपतो. मी चित्रपटासाठी गाणं लिहावं अशी राजकुमार हिरानी यांची इच्छा होती. ते गाणं नक्कीच तुम्हाला आवडेल, यात काही शंका नाही. चित्रपटाची संपूर्ण थीम त्या गाण्यातूनच मांडण्यात आली आहे.” (Bollywood)

“प्रीतमने ते गाणं उत्तम संगीतबद्ध केले आहे. पण त्याआधी मी गाणं लिहिलं आहे. मग प्रीतमने गाणं तयार केलं. असं अनेकदा झालंय, मला गाण्याच्या चालीवर (Tune) गाणं लिहायला सांगितले जाते. पण प्रीतमचा मोठेपणा इतका की, त्याने आधी मला गाणं लिहायला सांगितलं अन् मग गाण्याला चाल दिली.” (Bollywood Songs)

Javed Akhtar Reveals Dunki Climax
Madhura Velankar Film Screening At IFFI 2023: इफ्फीमध्ये मराठी चित्रपटांचा बोलबाला, मधुरा वेलणकरच्या ‘या’ चित्रपटाची होणार स्पेशल स्क्रीनिंग

शाहरुख खानच्या डंकीमधील एक गाणं गीतकार आणि शायर जावेद अख्तर यांनी लिहिले आहे. सध्या त्यांचे नेटकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे. हे गाणं सर्वात महत्वाचं असून त्या गाण्यावरच चित्रपटाचा शेवट अवलंबून असल्याचा जावेद अख्तर यांनी सांगितले. शाहरुखचा ‘डंकी’ येत्या डिसेंबर महिन्यामध्ये रिलीज होणार आहे.

चित्रपटामध्ये मुख्य भुमिकेत शाहरुख खान, तापसी पन्नू, दिया मिर्झा, बोमन इराणी, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष अशी दमदार कलाकारांची स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. तर चित्रपटामध्ये विकी कौशल कॅमिओ करणार आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ चित्रपट येत्या २१ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Javed Akhtar Reveals Dunki Climax
Bigg Boss 17: 'बिग बॉस १७'च्या स्पर्धकांना झटका, एलिमेशनमध्ये येणार मोठा ट्विस्ट; घराबाहेर जाणारा हा सदस्य?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com