Madhura Velankar Film Screening At IFFI 2023: इफ्फीमध्ये मराठी चित्रपटांचा बोलबाला, मधुरा वेलणकरच्या ‘या’ चित्रपटाची होणार स्पेशल स्क्रीनिंग

Madhura Velankar Film: यंदाच्या इफ्फी पुरस्कार सोहळ्याला फक्त बॉलिवूडसह मराठी चित्रपटांची देखील स्पेशल स्क्रीनिंग होणार आहे.
Madhura Velankar Film Screening At IFFI 2023
Madhura Velankar Film Screening At IFFI 2023Instagram
Published On

Madhura Velankar Film Screening At IFFI 2023

भारतीय सिनेसृष्टीमध्ये मानाचा समजल्या जाणाऱ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (International Film Festival Of India) या पुरस्कार सोहळ्याला आजपासून अर्थात २० नोव्हेंबरपासून सुरुवात होते.

ह्या पुरस्कार सोहळ्याला गोव्याची राजधानी पणजीतल्या श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते या इफ्फी पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. या फिल्म फेस्टिव्हलला फक्त बॉलिवूडसह अन्य चित्रपटांची नाही तर मराठी चित्रपटांची देखील स्पेशल स्क्रीनिंग होणार आहे.

Madhura Velankar Film Screening At IFFI 2023
Bigg Boss 17: 'बिग बॉस १७'च्या स्पर्धकांना झटका, एलिमेशनमध्ये येणार मोठा ट्विस्ट; घराबाहेर जाणारा हा सदस्य?

यंदाच्या इफ्फीमध्ये महाराष्ट्र शासनाकडून मीरा वेलणकर दिग्दर्शित ‘बटरफ्लाय’ चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. या चित्रपटाची स्क्रीनिंग येत्या बुधवारी म्हणजेच २२ नोव्हेंबरला होणार आहे. त्याआधी या चित्रपटाची स्पेशल स्क्रीनिंग एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा यांनी मंगळवार २१ नोव्हेंबरला रविंद्र भवन, मार्गो येथे संध्याकाळी ७ वाजता आयोजित केला आहे.

इफ्फीमध्ये आणि फिल्म बाजार या दोन्हीही ठिकाणी दाखवला जाणारा हा एकमेव मराठी चित्रपट आहे. अशा अनोख्या आणि आशयघन मराठी चित्रपटाची पहिल्यांदाच एकाच वेळी दोन ठिकाणी स्क्रीनिंग होणार आहे. यावेळी दिग्दर्शिका मीरा वेलणकर, निर्माते आणि अभिनेते अभिजीत साटम, अभिनेत्री मधुरा वेलणकर- साटम, ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर स्पेशल स्क्रीनिंगला उपस्थित राहणार आहेत.

Madhura Velankar Film Screening At IFFI 2023
Anushka Sharma आणि Athiya Shetty बद्दल असं काय बोलून गेला Harbhajan Singh?, नेटिझन्सनी केली माफी मागण्याची मागणी

बटरफ्लाय चित्रपटासोबतच उत्सवमूर्ती, प्रदक्षिणा आणि भंगार या मराठी चित्रपटांची इफ्फीमध्ये स्क्रीनिंग होणार आहे. सोहळ्यामध्ये, १३ वर्ल्ड प्रीमियर्स, १८ इंटरनॅशनल प्रीमियर्स, ६२ आशिया प्रीमियर्स, ८९ इंडिया प्रीमियर्ससाठी दर्जेदार चित्रपटांची निवड करण्यात आली असल्याची माहिती एनएफडीसीचे व्यावस्थापकीय संचालक प्रिथूल कुमार यांनी दिली. फिचर फिल्म ‘अट्टर’ आणि नॉन- फिचर फिल्म्स ‘अँड्रो ड्रिम्स’ या चित्रपटांच्या स्क्रीनिंगने सोहळ्याला सुरुवात होणार आहे. (Entertainment News)

Madhura Velankar Film Screening At IFFI 2023
Miss Universe 2023 Winner: २३ वर्षांच्या शेनिस पॅलासिओसने जिंकला ‘मिस युनिव्हर्स’चा किताब; सौंदर्यवती भावुक झाल्याचा व्हिडीओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com