Butterfly Marathi Movie: आपली स्वप्नं मरतात तेव्हा आपण मरतो... जगण्याची गोष्ट सांगणाऱ्या 'बटरफ्लाय' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Butterfly Marathi Movie Trailer OUT: आयुष्याला लखलख लाइटिंग झाल्यामुळे, कोषातून बाहेर पडून जगणाऱ्या तिची गोष्ट म्हणजेच "बटरफ्लाय".
Marathi Movie Butterfly Trailer Released
Marathi Movie Butterfly Trailer ReleasedSaam TV
Published On

Marathi Movie Butterfly Trailer Released: अभिनेत्री मधुरा वेलणकर बऱ्याच काळानंतर चित्रपटामध्ये दिसणार आहे. एक सामान्य स्त्रीची गोष्ट ती आपल्या भेटीला येणार आहे. तिच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. बटरफ्लाय असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट २ जूनला आपल्या भेटीला येणार आहे.

बटरफ्लाय चित्रपटाच्या ट्रेलरची सुरूवात मधुरा वेलणकर चिंताग्रस्त चेहऱ्याने होते. मागून व्हॉइस ओव्हर ट्रेलरची कथा थोडक्यात सांगितली जाते. 'आपली स्वप्नं मरतात तेव्हा आपण मरतो.' असा विचार या चित्रपटाच्या ट्रेलरमधून सांगण्यात आला आहे. संसारगाड्यात रमलेल्या होममेकरच्या स्वप्नांची गोष्ट या चित्रपटातून उलगडणार आहे. (Latest Entertainment News)

Marathi Movie Butterfly Trailer Released
Sara Ali Khan-Rakhi Sawant Video: राखी जरा जपून, सारा पडली असती ना! व्हिडिओ व्हायरल

प्रत्येक घरातली होममेकर आपल्या कुटुंबासाठी दिवसरात्र धडपडत असते. पण तिचीही काही स्वप्नं असतात. कामाच्या धावपळीत तिची स्वप्नं मागे पडतात. पण एक दिवस मेघाच्या (मधुरा वेलणकर) आयुष्यात एक अशी रंजक गोष्ट घडते ज्यामुळे तिचं दैनंदिन आयुष्य बदलून जाते. तिला सापडलेल्या एका नवीन वाटेला आणि स्वतःला ती अधिक प्राधान्य देते.

आयुष्याला लखलख लाइटिंग झाल्यामुळे, कोषातून बाहेर पडून जगणाऱ्या तिची गोष्ट म्हणजेच "बटरफ्लाय". सोशल मीडियामध्ये या चित्रपटाच्या ट्रेलरला भरभरून प्रतिसाद मिळत आहे, ट्रेलरचं कौतुक होत आहे. त्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. प्रत्येक गृहिणीच्या जिव्हाळ्याचा विषय या चित्रपटातून मांडण्यात आला आहे.

ज्येष्ठ अभिनेते, नाट्यनिर्माते अजित भुरे यांनी 'बटरफ्लाय' चित्रपट प्रस्तुत केला आहे. असीम एंटरटेन्मेंट आणि अॅप्रोग्रॅम स्टुडिओज यांनी बटरफ्लाय या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अजित भुरे, अभिजित साटम, मधुरा वेलणकर साटम या चित्रपटाचे निर्माते आहेत. मधुरा वेलणकर साटम यांच्या संकल्पनेला विभावरी देशपांडे यांनी कथेत बांधले आहे.

विभावरी देशपांडे आणि मीरा वेलणकर यांनी पटकथा लेखन, तर कल्याणी पाठारे, आदित्य इंगळे यांनी संवाद लेखन केले आहे. वैभव जोशी, गुरू ठाकूर यांनी गीतलेखन, शुभाजित मुखर्जी यांनी संगीत दिग्दर्शन, वासुदेव राणे यांनी छायांकन केले आहे.

वैशाली भैसने माडे आणि हंसिका अय्यर यांनी चित्रपटातली गाणी गायली आहेत. या चित्रपटात मधुरा वेलणकर साटम, अभिजित साटम, महेश मांजरेकर, राधा धारणे, सोनिया परचुरे, प्रदीप वेलणकर अशी उत्तम स्टारकास्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com